उपवर्गीकरण विरोधी भव्य मोर्चाच्या जनजागृतीसाठी परळीत एलईडी व्हॅनचे उद्घाटन 10 ऑगस्टला 59 अनुसूचित जाती एकवटणार

उपवर्गीकरण विरोधी  भव्य मोर्चाच्या जनजागृतीसाठी परळीत एलईडी  व्हॅनचे उद्घाटन 


 10 ऑगस्टला 59 अनुसूचित जाती एकवटणार 

परळी/ प्रतिनिधी 

    अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) विरोधात १० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचे उद्घाटन आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर  चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात आले.रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या सह अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती असणार आहे.

   या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधातील भूमिका, मोर्चाचे उद्दिष्ट तसेच समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. शहरासह ग्रामीण भागात ही व्हॅन फिरून जनजागृती करणार असल्याची माहिती मिळते आहे.
   यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. १० ऑगस्ट रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक आणि व्यापक स्वरूपाचा करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने