परळीतील रेल्वे उड्डाणपूल 26 ते 30 मे पर्यंत दुरुस्तीसाठी राहणार बंद
परळी बायपास रोडचा वाहतूकीसाठी वापर करण्याचे आवाहन
परळी प्रतिनिधी. परळी शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीसाठी 26 मे ते 30 मे यादरम्यान वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बीड आणि गंगाखेड तसेच परभणी कडे जाणाऱ्या वाहनधारकांनी परळी बायपास रोडचा वापर करावा असे आवहान राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, लातूर यांनी केले आहे.
परळी शहरातील शाम
मुखर्जी उड्डाणपूल हा अनेक दिवसापासून दुरुस्त करावा तसेच पूलाचे रुंदीकरण करावे अशी मागणी होत होती. पूलावरील नेहमी पडणा-या खड्ड्यामुळ दुरुस्ती करणे आवश्यक होते. दुरुस्तीचे हे काम २६ मे पासून सुरुवात होणार असून दुरुस्तीसाठी अडथळा निर्माण होऊ नये व काम करताना अपघात होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्था टोकवाडीवरून परळी कडे वळवण्यात येणार आहे. तरी वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग म्हणून परळी बायपास या मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. शाममुखर्जी उड्डाणपूलावर नेहमीच वाहतूक कोंडी होत होती.यामुळे समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाराजी चा सूर येत होता.

२६, ते ३०मे पर्यंत परळी कडे येणाऱ्या सर्व वाहनधारकांनी टोकवाडी, कनेरवाडी, परळी या दिशेने मार्ग खुला राहणार आहे. बीड तेलगाव मार्गे येणाऱ्या तसेच परभणी गंगाखेड कडून परळीला येणाऱ्या अंधारकांनी परळी बायपास रोडचा वापर करावा असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग,लातूरचे उपविभागीय अभियंता श.म.उरगुंडे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा