दौनापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीला परवानगी द्यावी अन्यथा 26 मे रोजी तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने - गौतम साळवे आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

दौनापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीला परवानगी द्यावी अन्यथा  26 मे रोजी तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने  - गौतम साळवे 

आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार 



परळी प्रतिनिधी.        परळी तालुक्यातील दौनापूर येथे महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीस परवानगी मिळावी यासाठी परळी तालुक्यातील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक 26 मे रोजी परळी तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम साळवे यांनी सांगितले आहे. या निदर्शनात परळी तालुक्यातील आंबेडकरी पक्ष, संघटना,
कार्यकर्ते व समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
       याबाबत परळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दौनापूर  येथील बौद्ध समाज दिनांक 20 मे पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसला आहे. तरीही अद्याप गेंड्याच कातडे पांघरलेल्या प्रशासनाने कमानीस परवानगी दिलेली नाही.दौनापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक, आहिल्याबाई होळकर चौक, संत भगवान बाबा चौक आदी महामानवांच्या नावाने चौक आहेत. परंतु समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीला परवानगी मागितली असता जातीवादी सरपंच आणि ग्रामपंचायतीने जातीय द्वेषाने परवानगी नाकारली आहे त्यामुळे संपूर्ण बौद्ध समाजाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रामपंचायतीने अवमान केलेला आहे.
   तरी आपण दोन दिवसात परवानगी द्यावी अन्यथा दिनांक 26 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या कार्यालयासमोर तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येतील. या निवेदनात परळी तालुक्यातील आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, तालुका अध्यक्ष गौतम साळवे, युवक अध्यक्ष राजेश सरवदे, युवा नेते धम्मा क्षिरसागर,संदीप ताटे आदी उपस्थित होते.

                      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने