मनोज जरांगे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी तुळजापूरकडे निघालेल्या मराठा युवकांच्या रॅलीतील एकास मारहाण ?

मनोज जरांगे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी तुळजापूरकडे निघालेल्या मराठा युवकांच्या रॅलीतील एकास मारहाण ?


परळी प्रतिनिधी.     आज सकाळी परळी येथून तुळजापूरकडे निघालेल्या मराठा समाजातील युवकांच्या रॅलीतील एकास मारहाण झाल्याची घटना घडल्याचे समजते. याप्रकरणी या रॅलीतील मराठा युवक तसेच मराठा समाज बांधव या घटनेचा निषेध करीत रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले आहेत. या घटनेतील आरोपीस अटक करण्याची मागणी होत आहे.
   याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत चांगली राहावी तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी तुळजापूरकडे शिरसाळा आणि परळी येथून काही युवक रॅली द्वारे निघाले हो
ते. त्यातील एकास परळीत मारहाण झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच परळी शहरातील सकल मराठा समाजाचे तरुण रस्त्यावरच ठाण मांडून बसले आहेत.
    या घटनेतील आरोपीस जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाहीत असा पवित्रा या युवकांनी घेतल्याचे समजते. दरम्यान कोणताही तणाव वाढू नये यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने