मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी विधानसभा शासकीय समितीच्या अध्यक्षपदी वाल्मीक अण्णा कराड
परळी प्रतिनिधी. महाराष्ट्रात राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी विधानसभा मतदारसंघ शासकीय समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,परळी नगर परिषदेचे गटनेते तथा कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मीक अण्णा कराड यांची जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी नियुक्ती केली आहे.
राज्य सरकारने नुकतीच महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येकी महिना 1500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी परळी विधानसभा मतदार संघाची शासकीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी रा
ष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तथा परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांची नियुक्ती केली आहे.
ष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तथा परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांची नियुक्ती केली आहे.
या समितीमध्ये परळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, परळीचे तहसीलदार तसेच महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी, समाज कल्याण आयुक्त तसेच दोन अशासकीय सदस्यांचाही समावेश असणार आहे. वाल्मीक अण्णा कराड यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा