मोदी लाट ओसरताच जिल्ह्यातील अनेक नेते व आमदार परतीच्या मार्गावर?
राज्यात व देशात नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा 'परफॉर्मन्स ' म्हणावा तसा चालला नाही. महाराष्ट्रात महायुती 43 वरून थेट 17 वर येऊन ठेपली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची लाट चालली नाही. विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला व महायुतीला फार करिष्मा दाखवता येईल अशी परिस्थिती नाही.म्हणून बीड जिल्ह्यातील काही विद्यमान आमदार व अनेक नेते हे परतीच्या मार्गावर आहेत.परंतु जुन्या पक्षाकडून त्यांना सध्या तरी 'वेट अँड वॉच ' सांगितले जात आहे. पण हे नेते व आमदार जुन्या पक्षात जाणार ही काळा दगडावरील पांढरी रेषा आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशात व राज्यात महायुतीचे चांगले प्रदर्शन राहील असे वाटत होते.मात्र राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट) सोबत घेतल्याने राज्यातील वातावरण पूर्णतः बदलून गेले. मुळातच भाजपाच्या धोरणा विरोधात जनसामान्यांमध्ये संताप होता.पक्ष फोडाफोडी आणि भ्रष्टाचारी नेत्यांना सोबत घेण भाजपाला परवडलं नाही. भाजपकडून भ्रष्टाचारी नेत्यांना जेलची हवा खाऊ घालणं अपेक्षित होतं. मात्र भाजप नेतृत्वाने व पंतप्र
धान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शहा हे चार दिवस अगोदरच राष्ट्रवादी किंवा खा.अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करतात आणि त्याच नेत्यांच्या प्रवेशासाठी मोदी -शहा पायघड्या घालून उभे टाकतात हे चित्र अनेकांना पटलं नाही. मुळात भाजप व संघांने याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे.
धान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शहा हे चार दिवस अगोदरच राष्ट्रवादी किंवा खा.अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करतात आणि त्याच नेत्यांच्या प्रवेशासाठी मोदी -शहा पायघड्या घालून उभे टाकतात हे चित्र अनेकांना पटलं नाही. मुळात भाजप व संघांने याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे.
. भाजपच्या ' कथनी आणि करणी ' मध्ये आता फरक दिसू लागला आहे. म्हणून राज्यातील जनतेने भाजप व महायुतीला कात्रजचा घाट दाखवला व थेट 43 वरून 17 वर आणून ठेवले. यातील मुंबईची एक जागा केवळ एका मताने जिंकली आहे.तसेच काही जागा या कमी मताच्या फरकाने जिंकल्या आहेत. त्यातच
' पिपाणी ' हे चिन्ह महायुतीला पावले आहे. नाहीतर केवळ दहा ते बारा जागा महायुतीला जिंकता आल्या असत्या आता सुद्धा परिस्थिती बदललेली नाही. ओबीसी, मराठा,मुस्लिम,बौद्ध हा वाद तसाच आहे.त्या आगीमध्ये तेल ओतण्याचे काम भाजपच्या काही नेत्यांकडून सुरू आहे. बीड जिल्ह्यातील नेत्यांनी व काही आमदारांनी विद्यमान परिस्थितीचे अवलोकन करून आता भाजपसोबत व महायुती सोबत राहणे परवडणारे नाही म्हणून त्यांचा तत्कालीन पक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी मध्यस्थामार्फत चर्चा केली आहे.जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद टोकाला पोहोचला आहे. त्याचे पडसाद महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारावर पडू शकतात.शिवाय आज शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या विषयी
' गुडवील 'आहे म्हणूनच जिल्ह्यातील काही आमदार व नेते जुन्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत.या आमदारांचा व नेत्यांचा भाजपला सुद्धा काही एक परिणाम झाला नाही.
सध्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जादू ओसरली असून मोदी सरकार हेच चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या कुबड्यावर आहे.म्हणून हे कधीही कोसळू शकते तसेच जिल्ह्यात तेवढा प्रभाव भाजपा व महायुतीचा राहिला नसल्याने विधानसभेला पराभूत उमेदवार म्हणून मिरवण्यापेक्षा पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. केजमधील मातब्बर नेते, माजलगाव मधील मातब्बर नेते,गेवराईचे आमदार व इतर ठिकाणचे काही आमदार यांनी खा. शरदचंद्र पवारांची भेट घेऊन ' आमचं तेवढं बघा ' म्हटल्याची चर्चा आहे. पवारांनी सुद्धा या दगाबाजांना आणि सुपारीबाजाना ' अभी नही ' म्हणत थोडं थांबण्यास सांगितलं असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. मोदींची जादू ओसरल्यावर तात्काळ भाजपातून उडी मारून जाणारे सुद्धा बीड जिल्ह्यात कमी नाहीत. आगे आगे देखो होता है क्या?
परमेश्वर गिते
संपादक
अंबाजोगाई
टिप्पणी पोस्ट करा