दलित वस्तीतील बोगस कामाच्या चौकशीच्या मागणीसाठी 28 मे रोजी पंचायत समितीच्या आवारात जनावरे सोडणार - मुक्ताराम गवळी
परळी प्रतिनिधी. परळी पंचायत समिती व जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या वतीने परळी तालुक्यात करण्यात आलेल्या दलित वस्तीतील बोगस कामांची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा दिनांक 28 मे रोजी परळी पंचायत समितीच्या आवारात जनावरे सोडून अनोखे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम गवळी यांनी दिला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती,परळी यांना21 मे रोजी दिलेल्या निवेदनात गवळी यांनी म्हटले आहे की, आपल्या कार्यालयाच्या वतीने तसेच जिल्हा परिषद , बांधकाम विभाग, अंबाजोगाई यांनी परळी तालुक्यातील दलित वस्तीचा निधी इतरत्र वळविला आहे.तसेच जे कामे केली आहेत ती बोगस आहेत
.बोगस कामे करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.या सर्व कामांच्या चौकशीसाठी यापूर्वी मुक्ताराम गवळी यांनी बीड जिल्हाधिकारी यांना 4 मार्च 2025 रोजी निवेदन दिले होते.परंतू त्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

त्यामुळे दिनांक 26 मे पर्यंत कारवाई झाली नाही तर दिनांक 28 मे रोजी परळी पंचायत समितीच्या आवारात गाय, बैल, म्हैस ,शेळी, कुत्रे, मांजर, आदी जनावरे सोडून आंदोलन करणार असल्याचे मुक्ताराम गवळी यांनी म्हटले आहे. गवळी यांच्या वेगळ्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा