डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी दौनापूर येथील बौद्ध समाजाच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस जिल्ह्यातील अनेक नेत्यांचा जाहीर पाठींबा

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी दौनापूर येथील बौद्ध समाजाच्या उपोषणाचा आज तिसरा  दिवस 

 जिल्ह्यातील अनेक नेत्यांचा जाहीर पाठींबा 

 

परळी ( प्रतिनिधी)     भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व बहुजन समाजाचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान उभारण्यासाठी परवानगी द्यावी  या मागणीसाठी आज दिनांक 20 मे पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाजाच्या वतीने महिला,लेकरा बाळासह उपोषण सुरू करण्यात आले होते.या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून बीड जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या अनेक नेत्यांनी उपोषणाला भेट देऊन आपला पाठींबा दिला. व कमानीला परवानगी न  दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या नेत्यांनी दिला आहे.
   याबाबत परळी तालुक्यातील दौनापूर येथील बौद्ध समाजाने बीड जिल्हाधिका
ऱ्यांना निवेदन दिले होते .या निवेदनात  म्हंटले होते की,दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी दौनापूर  येथील बौद्ध समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीला बौद्ध वस्ती समोरील रस्त्यावर प्रवेशद्वार अर्थातच कमान उभारण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला. त्यावर ग्रामपंचायतीने परवानगी तर दिलीच नाही उलट  सरपंच राजेभाऊ प्रभाकर आघाव यांनी  ग्रामपंचायतीचा ठराव घेतला.व ठरावा द्वारे कमानीला परवानगी देण्यात येणार नाही असे सांगितले होते.त्यानंतर दौनापूर येथील बौद्ध समाजाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वार,( कमान)  करण्याची परवानगी द्यावी अन्यथा 20 मे २०२५ पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. 
   आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.मिलिंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या आमरण उपोषणास  बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दयानंद भाऊ स्वामी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते बबनराव वडमारे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते धम्मानंद साळवे,वंचित बहुजन आघाडीच्या महिला नेत्या पुष्पाताई तुरुकमारे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वासनिक, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर वंचित  बीड जिल्हा नेते पुरुषोत्तम वीर, ज्येष्ठ नेते अर्जुन उजगरे, संभाजी ब्रिगेडचे नेते सेवकराम जाधव, जिल्हा प्रतिनिधी सुनील डोंगरे, पत्रकार केशव मुंडे, बहुजन विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ससाने, एकतावादीचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र पोटभरे, आर के आरसुळे, अंकुश गंगावणे, विठ्ठल ढोकणे, नितीन शिंदे ,भास्कर वाघमारे, वंचित ज्येष्ठ नेते भीमराव पायाळ, पत्रकार राजू जोगदंड, पत्रकार मिलिंद आदमाने, पत्रकार संतोष राजपूत, आझाद क्रांती सेना बीड कृष्णा पाटोळे इत्यादी अनेक मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
   दिलेल्या निवेदनानुसार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे तसेच उपोषण कर्ते रामचंद्र भगवान घाडगे, चंद्रमुनी रामकिशन घाडगे, रामचंद्र दिलीप बनसोडे, हरिभाऊ साधू घाडगे, किशन अच्युत घाडगे यांच्यासह  रोहिदास घाडगे, लक्ष्मण घाडगे, नागुराव गायकवाड, दिलीप बनसोडे ,कोंडीराम घाडगे, कमलाकर घाडगे, एडवोकेट विवेक वैद्य, धनंजय घाडगे ,दीपक बनसोडे, सुजित घाडगे, फुलचंद घाडगे, सचिन घाडगे, महेंद्र घाडगे, छगन घाडगे, कालिंदा घाडगे, रेखा घाडगे, कावेराबाई घाडगे, वैजयंती घाडगे, मोहिनी घाडगे, रेखा बनसोडे, मंदाबाई वाव्हळे आदी उपोषणाला बसले आहेत.
   .   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने