माजी जि. प. सदस्य विजयकुमार गंडले यांच्या जयंतीनिमित्त परळी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप विजयकुमार गंडले यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय होते- अजय मुंडे

माजी जि. प. सदस्य विजयकुमार गंडले यांच्या जयंतीनिमित्त परळी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप 

विजयकुमार गंडले यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय होते- अजय मुंडे 

परळी प्रतिनिधी.              बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा घाटनांदूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते विजयकुमार गंडले  यांच्या जयंतीनिमित्त परळी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिनांक 21 मे रोजी फळ वाटप करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा परिषदेचे गटनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजय मुंडे म्हणाले की, विजयकुमार गंडले यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय होते.
   परळी उपजिल्हा रुग्णालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुका अध्यक्ष वैजनाथराव सोळंके , प्रा. डॉ .विनोद
जगतकर, पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव, नेते दीपक तांदळे, जेष्ठ नेते सुरेश टाक, युवा नेते संजय आघाव,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ सावंत, ज्येष्ठ नेते सोपानराव ताटे,युवा नेते सिराजभाई, माजी नगरसेवक महेंद्र रोडे,आयुबभाई पठाण,  रवी मुळे,हे.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, विठ्ठलराव झिलमेवाड,विलास ताटे,प्रा .संजय रणखांबे, भारत ताटे,पत्रकार संभाजी मुंडे, पत्रकार धीरज जंगले ,पत्रकार विकास वाघमारेआदी उपस्थित होते.
    यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत साहित्यिक अजयकुमार गंडले, गौतम गंडले, सम्राट गंडले,मयुर गंडले,यश बनसोडे, गौरव गंडले आदिंनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रानबा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन अजयकुमार गंडले  यांनी केले.कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने