सदाशिव भालेराव यांना अभिरा फाउंडेशनचा महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार जाहीर
माजलगाव प्रतिनिधी. माजलगाव तालुक्यातील आदर्श शिक्षक तथा सदधम्म सेवा संघ माजलगावचे अध्यक्ष सदाशिव भालेराव गुरुजी यांना अभिरा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 16 ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत परभणी येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
सदाशिव भालेराव हे श्रावस्ती बुद्धविहार तथा , सदधम्म सेवा संघ माजलगाव चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत . सदधम्म सेवा संघाच्या माध्यमातून माजलगाव येथे श्रावस्ती बुद्धविहाराची निर्मिती करून बीड जिल्ह्यातील एकमेव तिर्थक्षेत्राचे मान्यता घेतली आहे.धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो. तसेच माजलगाव येथे बौद्ध धम्म परिषद यशस्वीरित्या पार पाडून बौद्ध धम्माचा प्रसारक म्हणूनही काम करतात.
ते माजलगाव तालुक्यातील सोमठाणा या गावचे रहिवासी आहेत .तसेच गेले 35 वर्षापेक्षा अधिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून विद्यादानाचे कार्य पार पाडत आहेत .कास्ट्राईब महासंघ चळवळीतील बीड जिल्हाचे नेतृत्व बऱ्याच वर्षांपासून करुन शिक्षकाचे प्रश्नांची सोडवणूक करत आहेत . तसेच मतदार यादी पुनन्रिज्क्षण यामध्ये उत्कृष्ठ (बिएलओ) कामा बद्दल तालुका व जिल्हास्तरावरील , पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व धम्म कार्याची दखल घेऊन अभिरा फाउंडेशन, परभणी महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा महाकवी वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्कार 2026 साठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
येत्या 16 ऑगस्ट 2026 रोजी परभणी येथे वामनदादा कर्डक त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून बी.रघुनाथ सभागृहात भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याचे संयोजक भदन्त मुदितानंद यांनी कळविले आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा