सावित्रीबाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश चाटे यांची निवडउपाध्यक्ष अरविंद काकडे, सचिव मधुकर सोलंकर, कोषाध्यक्षपदी अशोक शिंगाडे

सावित्रीबाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश चाटे यांची निवड

उपाध्यक्ष अरविंद काकडे, सचिव मधुकर सोलंकर, कोषाध्यक्षपदी  अशोक शिंगाडे

परळी प्रतिनिधी.       सावित्रीबाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका परळी वैजनाथ पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश चाटे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
       पतसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूक 2026-2031 कार्यक्रमानुसार आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी पतसंस्थेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी बैठक संपन्न झाली. याबाबत दिनांक 17/06/2026 रोजी प्रसिद्ध झाला व अनुसूची प्रमाणे सर्व प्रक्रिया नियमानुसार यथोचित पार पडली व दिनांक 09/07/2026रोजी अकरा उमेदवार बिनविरोध विरोध निवडून आले .असे श्री शिवराज नेहरकर निवडणूक निर्णय अधिकारी सावित्रीबाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका परळी वैजनाथ यांनी जाहीर केले होते .
   त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी शिवराज नेहरकर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडण्यात आले. अध्यक्षपदी  प्रकाश चाटे, उपाध्यक्ष अरविंद काकडे, सचिव मधुकर सोलंकर, कोषाध्यक्ष  अशोक शिंगाडे यांची बिनविरोध निवड झाली. सर्व विद्यमान संचालक मंडळाचे  रघुवीर रमेशराव राडीकर, शिवशंकर प्रभाकर जठार,नागेश दिगंबरराव रोडे कर्मचारी सावित्रीबाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका परळी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने