दैनिक सम्राट वाचक मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभा व आदर्श भीम जयंती महोत्सव समितीचा होणार सन्मान सामाजिक योगदानाबद्दल संपादक कुणाल कांबळे यांना देण्यात येणार 51 हजार रुपयांची थैली

दैनिक सम्राट वाचक मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभा व आदर्श भीम जयंती महोत्सव समितीचा होणार सन्मान 

सामाजिक योगदानाबद्दल संपादक कुणाल कांबळे यांना देण्यात येणार 51 हजार रुपयांची थैली 



परळी प्रतिनिधी.       फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र, सामान्य जनांचा बुलंद आवाज दैनिक वृतरत्न सम्राटचा वाचक मेळावा परळी येथे दिनांक 28 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात परळी तालुक्यात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणा-या भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित जयंती साजरी करीत असलेल्या आदर्श भीम जयंती महोत्सव समितीचा संपादक कुणाल कांबळे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.
         शहरातील नटराज रंग मंदिरात दिनांक 28 जून रोजी सकाळी 11 वाजता दैनिक सम्राटचा भव्य वाचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुलसी शैक्षणिक समूहाचे प्रमुख प्रा. प्रदीप रोडे तर कार्यक्रमाचे उद्घाटन संपादक कुणाल कांबळे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. सुनील मगरे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे, प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक अजय कुमार गंडले, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, परळी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संतोष रोडे ,विचारवंत प्रा. डॉ. दयानंद झिंजुर्डे मुक्टा शिक्षक संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे, व्ही.के. कलर होमचे संचालक विनोद कांबळे, एक वही एक पेन अभियानचे जनक विकास रोडे, दैनिक संघर्ष नेताचे संपादक मोहन व्हावळे, दैनिक पुण्यभूमीचे पत्रकार भगवान साकसमुद्रे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यात फुले, शाहू ,आंबेडकर विचारधारा महाराष्ट्रात घरोघरी पोहचविण्याचे काम करणाऱ्या तसेच बहुजनांवर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे कार्य करीत असलेल्या दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे यांना आंबेडकरी समाजाच्या वतीने 51 हजार रुपयांची थैली देण्यात येईल.तसेच तुलसी शैक्षणिक समूहाचे प्रमुख शिक्षणमहर्षी प्रा.प्रदीप रोडे यांचा विशेष गौरव तर आंबेडकरी पत्रकारितेत गेले 30 वर्षापासून कार्यरत असलेले जेष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
    याबरोबरच महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण, धम्म चळवळीतील योगदानाबद्दल परळी तालुका भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि डीजे मुक्त वैचारिक भीम जयंती साजरी करणा-या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श भीम जयंती महोत्सव समितीचा व परळी नगर परिषदेतील बौद्ध समाजाचे नगरसेवक महिंद्र रोडे नगरसेवक अनंत इंगळे नगरसेवक नितीन रोडे नगरसेवक भीमा डावरे नगरसेवक महादेव रोडे, नगरसेवक कार्तिक कांबळे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास शहरातील आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने