28 जून रोजी परळीत दैनिक सम्राटचा भव्य वाचक मेळावा व समाजाच्या वतीने संपादक कुणाल कांबळे यांना देण्यात येणार 51 हजार रुपयांची थैली राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणासह जेष्ठ पत्रकार उत्तम हजारे व शिक्षणमहर्षी प्रा.प्रदीप रोडे यांचा होणार सन्मान

 28  जून रोजी परळीत दैनिक सम्राटचा भव्य वाचक मेळावा व समाजाच्या वतीने संपादक कुणाल कांबळे यांना देण्यात येणार 51 हजार रुपयांची थैली 


राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणासह जेष्ठ पत्रकार उत्तम हजारे व शिक्षणमहर्षी प्रा.प्रदीप   रोडे यांचा होणार सन्मान 






परळी प्रतिनिधी.     आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र  व सामान्य जनांचा बुलंद आवाज दैनिक वृतरत्न सम्राटचा येत्या 28  जून रोजी परळीत भव्य वाचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.याच कार्यक्रमात संपादक कुणाल कांबळे यांना आंबेडकरी समाजाच्या वतीने 51 हजार रुपयांची थैली देण्यात येणार आहे.तसेच  महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण , आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तुलसी शैक्षणिक समूहाचे प्रमुख शिक्षणमहर्षी प्रा. प्रदीप रोडे यांचा विशेष गौरव तर आंबेडकरी पत्रकारितेत  गेले 30 वर्षापासून कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा विशेष विशेष सन्मान  करण्यात येणार असल्याचे संयोजक सम्राटचे परळी तालुका प्रतिनिधी रानबा गायकवाड यांनी सांगितले.
      26 जून हा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करा असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. जयंतीचे औचित्य साधून फुले, शाहू ,आंबेडकर चळवळीचे मुखपत्र व महाराष्ट्रातील तमाम बहुजनांचा बुलंद आवाज असलेल्या दैनिक सम्राटचा वाचक मेळावा रविवार दिनांक 28 जून रोजी परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. याच वाचक मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक सम्राट तसेच स्मृतीशेष विजयकुमार गंडले प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे, जेष्ठ पत्रकार उत्तम हजारे व इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येईल. निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक मुंबई येथील प्रा.स्नेहंकित सारंग, द्वितीय  पारितोषिक गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.अमित गुंजाळ, तृतीय आटपाडी, जिल्हा सांगली येथील विलास खरात तर उत्तेजनार्थ पारितोषिक कु.मधुरा विष्णु तायडे यांनी पटकाविले आहे.त्यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
   याबरोबरच दैनिक सम्राट चळवळीचे वृत्तपत्र असून अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे आणि शासन दरबारी आपला आवाज पोहोचवणारे वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रास आर्थिक मदत म्हणून समाजाच्या वतीने या वाचक मेळाव्यात संपादक कुणाल कांबळे यांना 51 हजार रुपयांची थैली देण्यात येणाऱ असल्याचे परळी तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक रानबा गायकवाड यांनी सांगितले आहे. वाचक मेळाव्यानंतर भीमशाहीर राहुल सूर्यवंशी यांचा भीमक्रांती आर्केस्ट्रा होणार आहे. या कार्यक्रमास आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक रानबा गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने