रिपाईची संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय बैठक संपन्न भास्कर रोडे यांनी केला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार

रिपाईची संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय 
बैठक संपन्न 


भास्कर रोडे यांनी केला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार 


परळी प्रतिनिधी. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय समाजकल्याण मंत्री खा.रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय बैठक नुकतीच संपन्न झाली.यावेळी रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे यांनी खा.रामदास आठवले यांचा सत्कार केला.
    केंद्रीय समाजकल्याण मंत्री झाल्यानंतर खा.रामदास आठवलेंच्या पहिल्यांदाच मराठवाडा दौऱ्यावर आले होते.या निमित्ताने संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय नेते व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला खा.आठवले यांनी मार्गदर्शन केले.
     या बैठकीस रिपाईचे  युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, उपाध्यक्ष प्रा.दासू वाघमारे आदी प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने