संस्कृती
कुत्र्याला बेडवर
माणसाला रोडवर
विकृतीची महती सांगणारी
इथे संस्कृती आमची मोठी
विचारात आणि
आचरणात अंतर
धर्मग्रंथाचिही भेदनिती
इथे संस्कृती आमची मोठी
रुढी परंपरा
अंधश्रद्धेवर भक्ती
प्रगतीचे पंख छाटणारी
इथे संस्कृती आमची मोठी
धर्म माणसासाठी की
माणूस धर्मासाठी
माणसालाच गोंधळात टाकणारी
इथे संस्कृती आमची मोठी
अभिमान वाटतो आम्हाला
जे घडलेच नाही ते सांगायला
चमत्काराला नमस्कार करणारी
इथे संस्कृती आमची मोठी
- रानबा गायकवाड
7020766674

टिप्पणी पोस्ट करा