पुरवठा अधिकारी बळवंत यांच्या हस्ते परळी बुलेटिनच्या जयंती विशेषांकांचे प्रकाशन संपन्न
बाबासाहेबांच्या क्रांतीकारी विचारांची पेरणी - अजयकुमार गंडले
परळी प्रतिनिधी. महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दैनिक परळी बुलेटीनच्या वतीने काढण्यात आलेल्या जयंती विशेषांकाचे प्रकाशन माजलगावचे पुरवठा अधिकारी विनोद बळवंत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.तर परळी बुलेटिनच्या जयंती विशेषांकातून महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिकांनी क्रांतीकारी विचारांची पेरणी केल्याचे प्रतिपादन साहित्यिक अजयकुमार गंडले यांनी या वेळी बोलताना केले.
येथील व्ही.के.कलर होम येथे संपन्न झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमास माजलगाव तालुक्याचे पुरवठा अधिकारी विनोद बळवंत, सामाजिक कार्यकर्ते दताभाऊ सावंत, प्रसिद्ध साहित्यिक अजयकुमार गंडले,परळी वीज निर्मिती केंद्राचे सहायक व्यवस्थापक विलास ताटे,व्ही.के.कलर होमचे संचालक विनोद कांबळे,कवी सायस आचार्य, पत्रकार विकास वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपादक रानबा गायकवाड यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला.प्रकाशनानंतर बोलताना साहित्यिक अजयकुमार गंडले म्हणाले की,रानबा गायकवाड यांनी दर्जेदार विशेषंकाची परंपरा आजही कायम ठेवली आहे.आजपर्यत अनेक नवोदित लेखकांना त्यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे.यावर्षीचा जयंती विशेषांक सुध्दा अतिशय दर्जेदार आणि वाचनीय झाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रानबा गायकवाड यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा