समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळयास परळीत सुरुवात

समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद 

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळयास परळीत सुरुवात 



परळी प्रतिनिधी.     प्रसिद्ध खंजिरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवन महाराज दवंडे यांच्या शिव, फुले ,शाहू, आंबेडकर समाज प्रबोधन कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. परळी शहरातील शिवाजीनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने संयुक्त जयंती सोहळ्यास काल दिनांक 11 एप्रिल पासून सुरुवात झाली.
   क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 199 जयंती 11 एप्रिल रोजी तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात येत आहे .या निमित्ताने शिवाजीनगर परळी येथे संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली. रात्री 8  वाजता लुंबिनी बुद्ध विहार येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन दिव्यांग विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक अजयकुमार गंडले होते .तर प्रमुख पाहुणे  म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार रानबा गायकवाड, नगरसेवक निळकंठ चाटे, नगरसेवक पिंटुभैय्या मुरकुटे, नगरसेवक भीमराव डावरे, पृथ्वी शिंदे, दिनेश गजमल आदी उपस्थित होते.
       यावेळी बोलताना डॉ.संतोष मुंडे म्हणाले की, एप्रिल महिन्यात तीन दिवसांत दोन महापुरुषांचा जन्म झाला आहे.त्यामुळे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे.तर अध्यक्षीय भाषणात अजयकुमार गंडले यांनी महात्मा फुले यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना महात्मा फुले हे त्याकाळी प्रचंड श्रीमंत होते तरी त्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी स्वतःला वाहून घेतले. महात्मा फुले यांनीच रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर एक हजार ओळींचा प्रथम पोवाडा लिहिला.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा असे आवाहन केले.यावेळी निळकंठ चाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
     यावेळी समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांनी खास शैलीत आजच्या भोंदुगिरीवर व देशातील विदारक परिस्थितीवर हल्ला चढवला.तसेच मनोरंजनातून प्रबोधन करतांना उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश गजमल उपाध्यक्ष सचिन कांबळे सचिव हरीश चव्हाण कोषाध्यक्ष मेघराज पारधे, कोषाध्यक्ष गणेश मोदानी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कवी सिद्धेश्वर इंगोले यांनी केले. कार्यक्रमास शिवाजीनगर तसेच परिसरातील महिला, पुरुष, बालक, बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने