वैज्ञानिक दृष्टिकोन हा मानवी जीवनाचा सार - भन्ते राहुल बोधी





वैज्ञानिक दृष्टिकोन हा मानवी जीवनाचा सार - भन्ते राहुल बोधी 


परळी प्रतिनिधी.     वैज्ञानिक दृष्टिकोन हा मानवी जीवनाचा सार असून तथागत गौतम बुद्धांनी  हाच विचार आपणाला दिला आहे. त्यामुळे अंधश्रद्धेला अजिबात थारा देऊ नये असे भन्ते राहुल बोधी यांनी सांगितले.राहुल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भन्ते राहुल बोधी यांची धम्मदेशना परळीतील भीमानगर येथे संपन्न झाली.
      परळी शहरातील भिमानगर या ठिकाणी व्ही. के. कलर होम च्या वतीने व भिमानगर सार्वजनिक जयंती समितीच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जयंती 11 एप्रिल रोजी सायंकाळी साजरी करण्यात आली. यावेळी पूज्यनीय भंते राहुल बोधी थेरो मुंबई यांची धम्मदेशना झाली.सर्वप्रथम 
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांच्या प्रतिमेस पुष्प,दीप व धुपाने पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी 
 नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अनंतराव इंगळे. नगरसेवक  महेंद्र रोडे ,अल्ताफ पठाण. ज्येष्ठ नेते.प्रा.दासू वाघमारे सर. नगरसेवक  महादू भाऊ रोडे 
प्रमुख पाहुणे.बौद्धाचार्य आनंद तूपसमुद्रे.
बालासाहेब निकाळजे . व्ही के कलर होम शाखा शिरसाळा संचालक गोविंद भाऊ मुंडे मारुती कांबळे केशव वायबसे संतोष घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. 
   आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन व्ही. के. कलर होम चे संचालक. धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजक  विनोद कांबळे यांनी सत्कार केला.तसेच विशाल कांबळे व जयंती कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी यांचा देखील पुष्पगुच्छ शाल अर्पण करून स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी धम्मदेशना देताना भंते राहुल बोधी म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी जीवनाचा सार आहे. आपण गरीब आहोत हे न सांगता बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास काय दिले ?आपण काय करायला पाहिजे? आपल्या जीवनात बदल घडवून प्रगतीपथावर कसे जाता येईल? यासाठी प्रयत्नशील राहा असे सांगितले. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन योगेश मुंडे यांनी केले तर आभार नामदेव पैठणे यांनी मानले. कार्यक्रमास महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने