विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा - सिद्धार्थ ओव्हाळ


विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा - सिद्धार्थ ओव्हाळ 


केज प्रतिनिधी.       विद्यार्थ्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा परिक्षेत यश हमखास मिळाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ ओव्हाळ यांनी केले.
भीमजन्मोत्सव २०२६ निमित्त भिमरत्न युवा प्रतिष्ठान, तांबवा  तर्फे आयोजित ज्ञान परीक्षा व शैक्षणिक उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

   या प्रसंगी सिद्धार्थ ओव्हाळ सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप, तयारीची पद्धत व अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.ज्ञान परीक्षा : ८ एप्रिल २०२६रोजी तर बक्षीस वितरण : १४ एप्रिल २०२६
 समाजमंदिर, तांबवा येथे पार पडणार आहे.या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन वाटप करण्यात येणार आहे.तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल आणि अल्पोपहार (स्नॅक्स) देखील देण्यात येणार आहे.
   या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, त्यांना प्रोत्साहन देणे व उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणे हा आहे.
भिमरत्न युवा प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात येत असलेले हे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यास हातभार लावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या मार्गदर्शन कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने