राष्ट्रपिता महात्मा फुले व क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 11 एप्रिल रोजी भन्ते राहुल बोधी यांची धम्मदेशना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - विनोद कांबळे

राष्ट्रपिता महात्मा फुले व क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 11  एप्रिल रोजी भन्ते राहुल बोधी यांची धम्मदेशना 


कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - विनोद कांबळे 


परळी प्रतिनिधी.      राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या 199 व्या तसेच क्रांतीसुर्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त परळीत मुंबई येथील भन्ते राहुल बोधी थेरो यांचे धम्मदेशना दिनांक 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
    11 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता परळी शहरातील भीमा नगर येथील बौद्ध विहाराच्या समोर मुंबई येथील भन्ते राहुल बोधी यांची धम्मदेशना होणार आहे.या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची 11 एप्रिल रोजी जयंती आहे तर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल रोजी साजरी करण्यात येत आहे.या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या धम्मदेशना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्ही.के.कलर होमचे संचालक विनोद कांबळे यांनी केले आहे.
    

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने