डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीतर्फे 17 एप्रिल पासून परळीत भीमजयंती महोत्सवाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीतर्फे 17 एप्रिल पासून परळीत भीमजयंती महोत्सवाचे आयोजन 


परळी प्रतिनिधी.     विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आदर्श जयंती उत्सव समिती परळीच्या वतीने 17 एप्रिल पासून व्याख्यान ,धम्मदेशना, आर्केस्ट्रा आदीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
   विश्वरत्न ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात देशभर साजरी करण्यात येत आहे .या निमित्ताने आदर्श सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने 14 एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून सकाळी पंचशील ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर 17 एप्रिल रोजी सकाळी 10  वाजता मिलिंद महाविद्यालयापासून समता रॅली निघणार असून टावर मार्गे रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप होईल. तर रात्री 8  वाजता मुंबई येथील प्रसिद्ध पत्रकार ,साहित्यिक ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे संविधान आणि संत विचार या विषयावर व्याख्यान होईल. 
   दिनांक 18 एप्रिल सायंकाळी 7  वाजता प्रकाश - बबन निर्मित भिमगुंजन आर्केस्ट्रा ,दिनांक 19 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार या विषयावर सकाळी 10 ते 11  या वेळेत मिलिंद महाविद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम , द्वितीय  आणि तृतीय विजेत्यांना रोख 1500 , 1000 , आणि 500 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर सायंकाळी 6  वाजता रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मैदान येथे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही या विषयावर भाषण स्पर्धा पार पडेल. प्रथम ,द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना रोख 1500,1000 आणि 500 रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहेत.
   दिनांक 20 एप्रिल रोजी शहरातील डॉ. भालचंद्र वाचनालयात सकाळी 6  वाजल्यापासून सलग अठरा तास अभ्यास उपक्रमास सुरुवात होईल. 21 एप्रिल रोजी सोनपेठ येथील सुरेश रंजवे प्रस्तुत भीमसंध्या संगीत आर्केस्ट्रा ,सायंकाळी 7  वाजता रेल्वे स्टेशन येथील मैदानावर होईल.दिनांक 22 एप्रिल पुणे येथील प्रबुद्ध साठे यांचे चला आपल्या बुद्धाच्या घरी या विषयावर सायंकाळी 7  वाजता व्याख्यान, 23 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एडवोकेट वैशाली डोळस यांचे सायंकाळी 7 वाजता व्याख्यान, भन्ते पय्यानंद थेरो, लातूर यांची 24 एप्रिल रोजी धम्मदेशना, 26 एप्रिल सायंकाळी 7  वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक ,विचारवंत उत्तम कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे.
   या भीम जयंती महोत्सवाचा समारोप 27 एप्रिल रोजी सायंकाळी परळी शहरातील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सामूहिक नृत्याने होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना शहरातील आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती उत्सव कमिटीच्या सुकाणू समिती , मार्गदर्शक कार्यकारी मंडळ,तसेच महिला कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने