कर्नाटकची एसटी महाराष्ट्र राज्य आणि हिंदी गाणी
चार दिवसांपूर्वी मी लातुरहून परळीला येण्यासाठी लातूर मधील बसस्थानक क्रमांक 2 वर सायंकाळी पाच वाजता बसची वाट पाहत बसलो होतो.उन्हाचा प्रचंड पारा वाढलेला. थोड्याच वेळात परळीला येणारी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे अथनी ते परळी बस आली. नवे कोरे गाडी स्थानकात आली प्रवासी खाली उतरले त्याबरोबर कंडक्टर हे झाले आला आणि गाडी जवळच उभा राहिला. मी बस मध्ये चढलो गाडीत मर्यादित प्रवासी दिसत होते सगळीकडे मोकळी जागा दिसत होती मला आनंद वाटला चला धक्का बुक्की ढकला ढकली वाचली.कारण आजकाल एखाद्या एस टी बस मध्ये चढुन बसण्यासाठी सीट मिळवणं म्हणजे युद्ध जिंकल्यासारखेच आहे.बसचा क्रमांक होता KA 23 F 1254अथनी ते परळी.
गाडीत बसण्यासाठी येणाऱ्या महिलांना व वयोवृद्ध नागरिकांना कंडक्टर सांगत होता या गाडीला हाफ तिकीट आणि मोफत चालत नाही.तसे आलेल्या महिला लगेच कंडक्टरकडे बघत परत वळत होत्या.काही महिला व पुरुष असु द्या फुल्ल तिकीट म्हणत बसमध्ये चढल्या. बस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, उत्कृष्ट आसन व्यवस्था,गाडीत सीसीटीव्ही कॅमेरे, आणि मनोरंजनासाठी बसच्या छताला साउंड सिस्टीम बसवलेली.
गर्दी कमी म्हणण्यापेक्षा नव्हतीच.बस अंबाजोगाईच्या जवळ येत असतांनाच कंडक्टरने कन्नड भाषेत ड्रायव्हरला काही तरी बोलला आणि त्याच्या मोबाईलवर हिंदी गाणी लावली.जो वादा किया वो निभाना पडेगा..हे जुन्या काळातील फेमस गाणं वाजू लागलं.सगळ्या बसमध्ये गाण्याचा आवाज घुमू लागला.तस मागे बसलेल्या तरुणाने आवाज दिला.' कंडक्टर साहेब हे लय जुंन झालं नवीन लावा काई तरी ' त्याची फरमाईश ऐकून कंडक्टर म्हणाला ' हमारे पास यहीच है ' असे म्हणत ते पूर्ण गाणे होऊ दिले.आणखी एक जुने गाणे लावून पुन्हा ये दिल है तेरे लिए गाणं लावलं.गाणं संपता संपता परळी आली आणि माझ्यासह सगळेच बसमधून खाली उतरले.
चित्रपट,कला, संगीत,गीत याला भाषेचे बंधन नसतं.भाषा,प्रांत,जाती धर्माच्या भिंती ओलांडून भावनेशी नाते जोडते.म्हणूंनच अनेक इंग्रजी, कन्नड,तेलगू, हिंदी मराठी आदी भाषांतील गाजलेल्या चित्रपटांतील गाणी अशीच लोकांच्या मनावर अधिराज्य करीत राहतील.
रानबा गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा