वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश
राख प्रकरणी मागण्या मान्य झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उपोषण स्थगित
मागासवर्गीयांनाही यापुढे राख वाटपात समान संधी मिळणार
परळी प्रतिनिधी. दाऊतपूर ग्रामपंचायतीने जातिय द्वेष भावनेतून फक्त मागासवर्गीयांना राख टेंडर प्रक्रियातून डावलले जात असल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या नेतृत्वाखाली परळी पंचायत समिती समोर आज दिनांक 30 मार्च रोजी सुरू केलेले उपोषण राख टेंडर वाटप प्रकरणात समान संधी देण्यात येईल असे लेखी आश्वासन गट विकास अधिकारी यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आपले उपोषण सायंकाळी माघारी घेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वीज निर्मिती केंद्राच्या वतीने देण्यात येणारी राख ही दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या मार्फत ठराविक लोकांनाच देण्यात येत होती. यामध्ये परळी वीज निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कमी दरामध्ये राख घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत होती. परंतु जाणीवपूर्व दाऊदपूर येथील मागासवर्गीयांना डावलले जात होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी परळीच्या वतीने जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता परळी पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
उपोषणात खालील प्रमुख मागण्यांचा समावेश होता. दाऊतपुर ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेले स्टॉकधारकांची तपशीलवार यादी व या स्टॉकधारकांना दाऊतपुर ग्रामपंचायत कोणत्या निकषाधारे स्टॉक धारक ठरवत आहे याची संपूर्ण माहिती द्यावी, दाऊतपुर ग्रामपंचायत यांनी कोण कोणत्या एजन्सींना किंवा व्यक्तींना राख उचलण्याचा गेट पास पावत्या आजपर्यंत दिल्या त्याची संपूर्ण माहिती देणे ,औष्णिक वीज निर्मिती केंद्राकडून दाऊतपूर ग्रामपंचायत यांनी किती मेट्रीक टन राख उचलण्याचा गेट पास घेतल्या आहेत व किती गेट पास शिल्लक आहेत याचा संपूर्ण तपशील द्यावा, दाऊदपूर ग्रामपंचायतचे मागासवर्गीय वार्डमधील ग्रामपंचायत सदस्य यांच्या नावे प्रभागातील मागासवर्गीय नागरिकांना राख उचलण्याच्या गेट पास पावत्या देण्यात याव्यात आदी प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य अंगद सुदाम बिडगर, ग्रामपंचायत सदस्य राहुल दगडू भालेराव, सचिन रमेश हरभरे, अक्षय अर्जुन सुरवसे, संतोष वसंत व्हावळे आकाश अश्रुबा मुंडे आदीं उपोषणाला बसले होते.
दरम्यान गट विकास अधिकारी भोसले यांनी सायंकाळी लेखी पत्र दिले व यापुढे राख वाटप प्रकरणात दाऊतपुर येथील मागासवर्गीयावर अन्याय होणार नाही ,त्यांनाही समान संधी देण्यात येईल असे लेखी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आपले उपोषण मागे घेतले. या उपोषणाला रिपाई राज्यसचिव भास्कर नाना रोडे , मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. दासू वाघमारे, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते माधवराव ताटे, कामगार नेते आर एच. वाव्हळे,मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब अदोडे, राख नियंत्रण कृती समिती दाऊतपूरचे अध्यक्ष सुग्रीव बिडगर आदींनी जाहीर पाठिंबा दिला. तर यावेळी गौतम भंडारे, मच्छिंद्र मुंडे, सिकंदर सावंत , भैय्यासाहेब गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे, तालुका अध्यक्ष गौतम साळवे,ता.युवा अध्यक्ष राजेश सरवदे, धम्मानंद क्षीरसागर,ता.युवा महासचिव ज्ञानेश्वर गीते, अविनाश मुंडे,युवा नेते शेख शाकेर अहमद, साहेबराव रोडे, सुभाष रोडे, भास्कर नावंदे, कुलदीप कांबळे, जयपाल सरवदे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा