भारत ताटे यांना पितृशोक, नारायण ताटे यांचे निधन, दुपारी 1.30 वाजता होणार अंत्यसंस्कार

भारत ताटे यांना पितृशोक, नारायण ताटे यांचे निधन, दुपारी 1.30 वाजता होणार अंत्यसंस्कार 



परळी प्रतिनिधी.     परळी शहरातील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते भारत ताटे यांचे वडील नारायण केरबा ताटे यांचे आज दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर दुपारी 1 .30 वाजता भीमनगर येथील शांतीवन स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहे.
    भारत भाऊ ताटे यांचे वडील व परळी नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी स्मृतीशेष नारायण केरबा ताटे यांचे वयाच्या 94व्या वर्षी आज दि. 24 एप्रिल रोजी रोजी सकाळी  वृद्धापकाळाने भीमनगर येथील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 1.30 वाजता भीमनगर येथील शांतीवन स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.दुपारी 1.30 वाजता राहते घर भिमनगर, ताटे गल्ली येथून अंत्ययात्रा शांतीवन स्मशानभूमीकडे निघेल. दिवंगत नारायण केरबा ताटे यांच्या पश्चात 4  मुले, 5  मुली सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने