तरुणांनी व्यसनाकडे न वळता धम्माकडे वळावे - भन्ते पय्यानंद थेरो बुद्ध धम्म हा आचरणातून दिसला पाहिजे - हनुमंत वाघमारे

तरुणांनी व्यसनाकडे न वळता धम्माकडे वळावे - भन्ते पय्यानंद थेरो 


बुद्ध धम्म हा आचरणातून दिसला पाहिजे - हनुमंत वाघमारे 



परळी प्रतिनिधी.       आजच्या तरुणांनी व्यसनाकडे न वळता धम्माकडे वळावे असे प्रतिपादन लातुर येथील भन्ते पय्यानंद थेरो यांनी केले.ते परळी येथे विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धम्मदेशना प्रसंगी बोलत होते.तर बुद्ध धम्म हा आचरणातून दिसला पाहिजे असे मत भारतीय बौद्ध महासभेचे परळी तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमारे यांनी व्यक्त केले.
          महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आदर्श जयंती उत्सव समितीच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर काल रात्री 8 वाजता भन्ते पय्यानंद थेरो यांची धम्मदेशना संपन्न झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष हनुमंत वाघमारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सिध्दार्थ जगतकर हे होते.यावेळी आपल्या धम्मदेशनेत भन्ते पय्यानंद थेरो म्हणाले की, प्रत्येक बुद्ध अनुयायांनी दर रविवारी बुद्ध विहारात जायलाच पाहिजे.संपुर्ण कुटुंबाने धम्माप्रमाणे आचरण केले पाहिजे.
      ढोंगी कार्यकर्ते यांचा समाचार घेताना भन्ते पय्यानंद थेरो म्हणाले की,समाजात कार्यकर्ते म्हणून फिरणाऱ्या अनेकांच्या बायका आणि मुले दैववादी दिसून येतात ते थांबले पाहिजे.समाजाची त्यांच्याकडून धम्म कार्याची अपेक्षा असते.आपला तरुण भरकटत असून व्यसनाधीन बनत चालला आहे.यातून बाहेर काढण्यासाठी तरुणांनी धम्माकडे वळले पाहिजे.यावेळी हनुमंत वाघमारे, डॉ सिद्धार्थ जगतकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
      कार्यक्रमास शहरातील नागरिक, बौद्ध उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने