बुद्ध जयंतीनिमित्त परळीत 1 मे रोजी भव्य धम्म रॅली व भन्ते धम्मबोधी आणि भन्ते मोग्गलायन यांची धम्मदेशना

बुद्ध जयंतीनिमित्त परळीत 1 मे रोजी भव्य धम्म रॅली व भन्ते धम्मबोधी आणि भन्ते मोग्गलायन यांची धम्मदेशना 


परळी प्रतिनिधी.      अखिल विश्वाला शांती आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची 1 मे रोजी होत असलेल्या 2570 व्या जयंतीनिमित्त परळी शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य धम्म रॅली व त्यानंतर अजनी , नागपूर येथील भन्ते धम्मबोधी व भन्ते महामोग्गलायन यांची धम्मदेशना होणार आहे.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
       दिनांक 1 मे शुक्रवार रोजी तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती आहे.या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा,शाखा परळी तालुका व शहर यांच्या वतीने भव्य धम्म रॅली काढण्यात येणार आहे.राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून सायंकाळी 6 वाजता धम्म रॅलीस सुरवात होईल.पुढे मोंढा मार्केट, स्टेशन रोड, एक मिनार चौक मार्गे रॅली रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचणार आहे. तेथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर  भारतीय बौद्ध महासभेचे परळी तालुका अध्यक्ष हनुमंत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात भन्ते धम्मबोधी, वैशाली बुद्ध भुमी नागपूर आणि पोखर्णी येथील भंन्ते मोग्गलायन यांची धम्मदेशना होणार आहे.
    या धम्म रॅली त बौद्ध उपासक, उपासिका व बुद्ध अनुयायांनी शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दलाच्या वतीने  करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने