*परळी रेल्वे स्टेशन ऑटो चालक-मालक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अभिमान बुक्तर यांची बिनविरोध निवड*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी १३५ व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, परळी रेल्वे स्टेशन परिसरातील ऑटो चालक आणि मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी अभिमान बुक्तर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात पार पडलेल्या या बैठकीत आगामी जयंती उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
अध्यक्ष: अभिमान बुक्तर
उपाध्यक्ष: बाळासाहेब शिंदे
कोषाध्यक्ष: तिरुपती वाघमारे
सल्लागार समिती: विलास गायकवाड, बाळासाहेब कांबळे, शेख बाबा (पत्रकार), संतोष मस्के.
नियोजनावर सविस्तर चर्चा:
या बैठकीत केवळ निवडीच नव्हे, तर जयंतीदिनी निघणाऱ्या मिरवणुकीचे चोख नियोजन, वाहतुकीचे नियम पाळून राखायची शिस्त आणि दरवर्षीप्रमाणे राबवण्यात येणारा भव्य अन्नदान कार्यक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अभिमान बुक्तर यांच्या निवडीचे सर्व ऑटो चालक बांधवांनी स्वागत केले असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. या प्रसंगी रघुनाथ शिरसाठ, फिरोज पिंजारी, श्रीकांत गंभीरे, सोनू कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा