घरकुलांसह वैयक्तिक लाभाच्या योजनांची लाभार्थी संख्या आणि विकास कामे दुपटीने करण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे प्रधानमंत्री आवास योजनेतून ६७७ घरकुल लाभार्थींना पहिल्या हप्त्याची प्रत्येकी एक लाख रुपये रक्कम धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरीत

घरकुलांसह वैयक्तिक लाभाच्या योजनांची लाभार्थी संख्या आणि विकास कामे दुपटीने करण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे 

प्रधानमंत्री आवास योजनेतून ६७७ घरकुल लाभार्थींना पहिल्या हप्त्याची प्रत्येकी एक लाख रुपये रक्कम धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरीत



परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ शहर विकासाच्या वाटेवर असून मागील काही दिवसांत मी अत्यंत कठीण परिस्थितीत असताना परळीतील नागरिकांनी महायुतीच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करत नगर परिषद आमच्या ताब्यात दिली. त्यामुळे विविध योजनेतील घरकुले, अन्य वैयक्तिक लाभाच्या योजनामधील लाभार्थी संख्या आणि सार्वजनिक हिताच्या विकासकामांचा वेग आता दुप्पट करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने अधिक व्यापक काम करणार असल्याचे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना व्यक्त केले. 

परळी वैद्यनाथ नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत मंजूर 677 घरकुल लाभार्थींना पहिल्या हप्त्याची प्रत्येकी एक लाख रुपये रक्कमेचे धनादेश आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात वितरीत करण्यात आले. 

यावेळी नगर परिषद अंतर्गत रमाई आवास योजनेतून आणखी 200 घरकुले मंजूर करण्यात आली असून त्याचे प्रस्ताव व अन्य बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकारी व नगरसेवकांना दिल्या. 

या कार्यक्रमा प्रसंगी 565 दिव्यांग बांधवांना नगर परिषदेच्या 5% राखीव निधीतून आर्थिक मदतीचेही वितरण श्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

मागील काही महिन्यात राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी मला ठरवून बदनाम केले, मात्र माझी परळीची जनता ठामपणे माझ्या पाठीशी उभी आहे, याचा मला अभिमान व आनंद वाटतो आणि तितकीच जबाबदारीची जाणीवही होते, असेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले. 

याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे, दिव्यांग कल्याण महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, राजा खान, प्रा. पवन मुंडे, रवींद्र गित्ते, राजाभाऊ पोळ, माणिकभाऊ फड, श्रीकृष्ण कराड यांच्या सह विविध प्रभागातील नगरसेवक, नगर परिषद मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने