निकृष्ट,बोगस आणि अपूर्ण कामे करणा-या श्रीनाथ इंजिनियरचे टेंडर रद्द करापरळीच्या विकासासाठी बहुतांश नगरसेवकांची इच्छा

निकृष्ट,बोगस आणि अपूर्ण कामे करणा-या श्रीनाथ इंजिनियरचे टेंडर रद्द करा

परळीच्या विकासासाठी बहुतांश नगरसेवकांची इच्छा

परळी प्रतिनिधी.   निकृष्ट दर्जाची बोगस आणि अपूर्ण कामे करणा-या श्रीनाथ इंजिनियर लातूर यांना देण्यात आलेले 19 कोटी रुपयांचे टेंडर रद्द करावे ही परळी शहरातील बहुतांश नगरसेवकांची सुध्दा इच्छा आहे.काहींनी काल 16 रोजी सुरू झालेल्या पत्रकार संघाच्या आमरण उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला तर अनेकांच्या मनात तीच भावना असल्याचे बोलले जात आहे.आता प्रशासन काय भुमिका घेते याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.
     नुकतेच 11 मार्च रोजी परळी वैजनाथ शहरात विविध विकास कामांचे 19 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. डीपीडीसी 2025 -26 अंतर्गत 17 कोटी तसेच आमदार धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 2 कोटी असे एकूण 19 कोटी रुपयांची कामे श्रीनाथ इंजिनियर लातूर यांना देण्यात आली आहेत.यापूर्वी परळी शहरातील भुयारी गटारी व अंतर्गत रस्ते अंडरग्राउंड नाल्या,चेंबर, नटराज रंगमंदिर,भीमवाडी येथील बौद्ध विहार यांचे काम संबंधित एजन्सीने पूर्ण केलेले नाही.
   नगरोत्थान योजनेअंतर्गत कामांची मुदत संपली तरी परळीतील अनेक वस्तीतील रस्ते व नाल्या झालेल्या नाहीत.बरकतनगर जवळ उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण केलेला नाही.शहरातील नागरिकांना अपूर्ण कामामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कामाचा कोणताही दर्जा आणि गुणवत्ता नसताना परत 19 कोटी रुपयांचे टेंडर दिले आहे.या कामांतही निश्चितच अशाच प्रकारच्या निकृष्ट व बोगस कामे झाल्याशिवाय राहणार नाहीत.त्यामूळे सदर टेंडर रद्द करावे व पुन्हा एकदा नव्याने टेंडर काढावे या मागणीसाठी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने परळी नगर परिषद मुख्याधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.या उपोषणाला काल शहरातील विविध पक्ष सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने