निकृष्ट कामे रोखण्यासाठी विविध विकास कामांचे 19 कोटी रुपयांचे टेंडर रद्द करण्याच्या मागणीसाठी पत्रकार संघाचे अमरण उपोषण सुरूविविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा ,


निकृष्ट कामे रोखण्यासाठी विविध विकास कामांचे 19 कोटी रुपयांचे  टेंडर  रद्द करण्याच्या मागणीसाठी पत्रकार संघाचे  अमरण उपोषण सुरू

विविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा ,



परळी (प्रतिनिधी)
      परळी वैजनाथ शहरात यापूर्वी नगरोत्थान सुवर्ण जयंती शहरी विकास योजना अंतर्गत 110 कोटी रुपयांची अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करणा- या लातूर येथील श्रीनाथ इंजिनियर यांना परत एकदा परळी नगर परिषदेने डी.पी.डी.सी.20250-2026 अंतर्गत 19 कोटी रुपयांची विविध विकास कामांचे दिलेले टेंडर त्वरित रदद करावे यावे व संबंधित यशला ब्लॅकलिस्ट करावे या मागणीसाठी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 16 मार्च रोजी परळी नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात आले.या उपोषणाला परळी शहरातील विविध पक्ष व संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दिला.
        श्रीनाथ इंजिनियर लातूर यांनी यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत असलेली 110 कोटी रुपयांची कामे पूर्ण केलेली नाहीत .शहरातील भुयारी गटाराचे चेंबर अनेक ठिकाणी रस्त्यावर उंच तर काही ठिकाणी खोल असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक नागरिकांना अपघातात गंभीर दुखापती झाल्या आहेत.विविध पक्ष व संघटना आणि नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत. तरीही  संबंधित एजन्सीला १९ कोटी रुपयांच्या  कामांचे टेंडर देण्यात आले.
   श्रीनाथ इंजिनियर लातूर यांचा यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत कामातील परळीकरांना आलेला वाईट अनुभव लक्षात घेता सध्या काढण्यात आलेले 19 कोटी रुपयांची कामे टेंडर रद्द करून  व  चांगल्या दर्जाची कामे व्हावेत याकरिता परत टेंडर काढावे अशी मागणी ही पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
उपोषणाला पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रानबा गायकवाड, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष धीरज जंगले, शहराध्यक्ष शेख मुकरम, उपाध्यक्ष बाबा शेख आदी पत्रकार उपोषणाला बसले आहेत.
   या उपोषणाला शिवसेना नेते तथा नगरसेवक व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख वैजनाथ माने, कामगार नेते गौतम आगळे,नगरसेवक अश्विन मोगरकर, नगरसेवक नितीन बागवाले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, प्रसेनजित रोडे, राजेश सरवदे, कांग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्ष रसूल खान, सामाजिक कार्यकर्ते राहुल घोबाळे,प्रा.विलास रोडे, इंजिनियर भगवान साकसमुद्रे, संपादक भगिरथ बददर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, माजी  नगरसेवक केशव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रमेश फड, कामगार संघटनेचे शेख जमीर याबरोबरच संपादक संपादक बालासाहेब कडबाने, संपादक रामप्रसाद गरड, संपादक शिवशंकर झाडे, संपादक मोहन व्हावळे, पत्रकार धनंजय आढाव, संपादक कैलास डुमणे, पत्रकार महादेव शिंदे, पत्रकार माणिक कोकाटे, पत्रकार सुमीत गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने