विविध विकास कामांचे 19 कोटी रुपयांचे कामांचे टेंडर रद्द करण्याच्या मागणीसाठी पत्रकार संघाचे उद्या अमरण उपोषण
नव्याने टेंडर काढण्याची पत्रकार संघाची मागणी
परळी (प्रतिनिधी)
परळी वैजनाथ शहरात यापूर्वी नगरोत्थान सुवर्ण जयंती शहरी विकास योजना अंतर्गत 110 कोटी रुपयांची अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करणा- या लातूर येथील श्रीनाथ इंजिनियर यांना परत एकदा परळी नगर परिषदेने डी.पी.डी.सी.20250-2026 अंतर्गत 19 कोटी रुपयांची विविध विकास कामांचे दिलेले टेंडर त्वरित रदद करावे या मागणीसाठी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने उद्या 16 मार्च रोजी परळी नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे.
याबाबत परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीनाथ इंजिनियर लातूर यांनी यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत असलेली 110 कोटी रुपयांची कामे पूर्ण केलेली नाहीत .शहरातील भुयारी गटाराचे चेंबर अनेक ठिकाणी रस्त्यावर उंच तर काही ठिकाणी खोल असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक नागरिकांना अपघातात गंभीर दुखापती झाल्या आहेत.विविध पक्ष व संघटना आणि नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत.11 मार्च रोजी १९ कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले.सदरील कामे ही परळी शहराचे वाटोळे करणाऱ्या लातुरच्या श्रीनाथ इंजिनियर गुत्तेदारास देण्यात आली आहेत.
श्रीनाथ इंजिनियर लातूर यांचा यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत कामातील परळीकरांना आलेला वाईट अनुभव लक्षात घेता सध्या काढण्यात आलेले 19 कोटी रुपयांची कामे टेंडर रद्द करून व चांगल्या दर्जाची कामे व्हावेत याकरिता परत टेंडर काढावे अशी मागणी ही पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रानबा गायकवाड, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष धीरज जंगले, शहराध्यक्ष शेख मुकरम, उपाध्यक्ष बाबा शेख, आदी पत्रकारांच्या आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा