परळी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर
दोन नराधमांकडून अत्याचार
परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात एका १६ वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली आहे.या घटनेने बीड जिल्हृयात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी मुलीला बहाणा करून घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून दोघांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली.
पीडितेने पालकांना आपबिती सांगितल्यानंतर, परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने बीड जिल्हृयात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा