डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धांचे आयोजन- रानबा गायकवाड
मान्यवरांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण
परळी प्रतिनिधी. महामानव ,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त दैनिक सम्राट व सायं .दै.परळी बुलेटिनच्या वतीने निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य संयोजक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात महान विद्वान होते. संपूर्ण जग त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखते. भारतीय राज्यघटनेचे निर्माते तथा या देशाचे नवराष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत . या देशातील तमाम महिलांच्या उद्धाराकरिता त्यांनी भारतीय राज्यघटनेत आणि हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महान असे कार्य केले आहे.त्यामुळे त्यांच्या कार्यावर निबंधाच्या माध्यमातून प्रकाश टाकावा याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
निबंध स्पर्धेसाठी राष्ट्रनायक डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतातील महिलांचे उद्धारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर , तसेच भारतीय संविधान व धर्म स्वातंत्र्य हे विषय ठेवण्यात आले आहेत. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली असून तीन पैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा लागेल.प्रथम पारितोषिक 2000 रुपये द्वितीय पारितोषिक 1500 आणि तृतीय पारितोषिक 500 रुपये व प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप असणार आहे. निबंध स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपला निंबध दिनांक 1 एप्रिलपर्यंत 9420148538 व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ranbagaikwadpress1@gmail.com या मेलवर स्वच्छ अक्षरात अथवा टाईप करून पासपोर्ट फोटो व पूर्ण पत्यासह पाठवावा. निबंध स्पर्धेचे शब्द मर्यादा 1000 शब्दापर्यंत बंधनकारक आहे. विजेत्यांची नावे 11 एप्रिल रोजी घोषित करण्यात येतील अशी माहिती रानबा गायकवाड , साहित्यिक अजयकुमार गंडले,प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे कवी बालाजी कांबळे , पत्रकार विकास वाघमारे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा