सौ.अर्चना मधुकर गित्ते यांचे संशोधन क्षेत्रात घवघवीत यश पीएचडी संशोधनातून आंतरराष्ट्रीय डिझाइन नोंदणीपर्यंतचा यशस्वी प्रवास

सौ.अर्चना मधुकर गित्ते यांचे संशोधन क्षेत्रात घवघवीत यश  पीएचडी संशोधनातून आंतरराष्ट्रीय डिझाइन नोंदणीपर्यंतचा यशस्वी प्रवास

परळी वैजनाथ | प्रतिनिधी
     परळी वैजनाथ येथील संशोधक सौ. अर्चना मधुकर गित्ते यांच्या पीएचडी च्या संशोधनावर आधारित “Automated Pneumatic Fish Feed Dispenser Housing” या संकल्पनेच्या डिझाइनला युनायटेड किंगडम इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिस (UK IPO) कडून अधिकृत डिझाइन नोंदणी (Registered Design) प्राप्त झाली आहे.

       या डिझाइनची नोंदणी ३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली असून २० जानेवारी २०२६ रोजी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. या संशोधनाधारित डिझाइनला डिझाइन क्रमांक 6496902 देण्यात आला आहे. हे डिझाइन आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरणांतर्गत Class 30 – Articles for the care and handling of animals या वर्गात नोंदणीकृत आहे.पीएचडी दरम्यान केलेल्या सखोल अभ्यास, प्रयोग आणि तांत्रिक विश्लेषणातून विकसित झालेल्या या संकल्पनेमुळे मत्स्यपालन क्षेत्रातील स्वयंचलित खाद्य व्यवस्थापनास चालना मिळणार आहे. शैक्षणिक संशोधन केवळ प्रबंधापुरते मर्यादित न राहता त्याचे बौद्धिक संपदा हक्कांमध्ये (Intellectual Property Rights) रूपांतर होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

या यशामुळे विद्यापीठीय संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगाभिमुख अभ्यास यांतील दुवा अधिक मजबूत होत असून, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचे व्यावहारिक व जागतिक मूल्य अधोरेखित झाले आहे. शिक्षण क्षेत्रातून संशोधन व नवकल्पनांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होऊ शकते, याची ही प्रेरणादायी बाब मानली जात आहे. या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने