34 व्या बौद्ध धम्म परिषदेत आंबेडकरी चळवळीतील दशरथ शिंदे यांचा गौरव
परळी प्रतिनिधी. अमरावती जिल्ह्यातील महाबोधी बहुउद्देशीय संस्था,वटफळी येथे संपन्न झालेल्या 34 व्या बौद्ध धम्म परिषदेत परळी तालुक्यातील जेष्ठ आंबेडकरी चळवळीतील नेते दशरथ आबा शिंदे यांचा गौरव करण्यात आला.
नुकतीच वटफळी येथे 34 वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली.या परिषदेत परळी तालुक्यातील मोहा येथील दशरथ आबा शिंदे यांचा त्यांनी आंबेडकरी चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल भदन्त डॉ.एच.आर.धम्मदीप महाथेरो यांच्या हस्ते विशेष सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी भदंत डॉ.हर्षबोधी महाथेरो, अध्यक्ष भदन्त डॉ.नागघोष महाथेरो आदी उपस्थित होते.
दशरथ आबा शिंदे हे गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्य करीत आहेत.अनेक सामाजिक आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.मराठवाड्यातील संभाजीनगर येथे असलेल्या मराठवाडा विद्यापीठास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे म्हणून जो नामांतर लढा उभारला गेला त्यातही ते अग्रभागी होते.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी बौद्ध भिक्खूनी आर्या , प्रमोद किरवले, मंगलाताई किरवले, साहेबराव किरवले,वटफळीचे सरपंच यांच्या सह बौद्ध उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा