मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा विद्यार्थीनीने केली थेट मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार ,मूल्यांकनाकडे वेधले लक्ष

मुख्यमंत्री माझी शाळा-  सुंदर शाळा 

 विद्यार्थीनीने केली थेट मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार ,मूल्यांकनाकडे वेधले लक्ष 




परळी ( प्रतिनिधी. )    मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन अभियान अंतर्गत सुरू असलेल्या शाळांच्या तपासणीत आपल्या शाळेला देण्यात आलेले मूल्यांकन हे अन्यायकारक व चुकीचे आहे हे लक्षात आल्यावर विद्यार्थ्यानिने थेट राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना तक्रार करून मूल्यांकनाकडे लक्ष वेधले आहे.
     जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहा येथील  विद्यार्थिनीने याची कैफियत थेट मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे.
या पत्रामध्ये तिने असे म्हटले आहे की,
आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपल्या चरणी साष्टांग दंडवत मी मानसी नवनाथ शेरकर .जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहा, तालुका परळी येथे इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असून माझ्या शाळेने टप्पा क्रमांक एक मध्ये परळी तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळवला होता.
   चालू अभियानामध्ये आम्ही अति उत्साहाने सक्रिय सहभागी होतो. आम्हाला आमच्या सरांनी सांगितले की परळी तालुक्यातील सर्व केंद्रांमधून आपल्या शाळेला सर्वात जास्त गुण प्राप्त झालेले आहेत. तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा  झाला. आमच्या कामाची पोहोच आम्हाला मिळत आहे असे वाटू लागले, परंतु तालुकास्तरीय समितीने आमच्या शाळेपेक्षा ज्या शाळेत कमी सोयी सुविधा आहेत, ज्या शाळेला विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही नाहीत, ज्या शाळेला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फर्निचर नाही, ज्या शाळेला विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये त्यांना पुरेल एवढे पाणी नाही.जी शाळा बरेचसे निकषांची पूर्तता करत नाही ती शाळा गुणदानात तालुक्यात प्रथम काढली.नियमाप्रमाणे अनेक बाबींची कमतरता असताना ती शाळा प्रथम येथेच कशी?
   त्यामुळे या अभियाना अंतर्गत केलेल्या गुणदानाची फेर तपासणी करण्यात यावी.
अशा आशयाचे पत्र विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना मानसी शेरकर या विद्यार्थिनीने 
आता यासंबंधी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले आहे.आता या शाळांची फेर तपासणी होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.संबंधित विद्यार्थिनीला प्रशासन न्याय देते का? का हे ही प्रकरण प्रशासन व शिक्षण विभाग तसेच बसत्यात गुंडाळतो  हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने