जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद
परळी (प्रतिनिधी) ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जवळा फकीर,ता.धारूर येथे दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे.
मृगदायवन महाविहार सारनाथ पार्क जवळा फकीर तालुका धारुर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ.प्रा.खेमधम्मो,मुळावा यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी डॉ.भदन्त उपगुप्त महाथेरो,पूर्णा, ध्वजारोहण डॉ.प्रा.भदन्त एम.सत्यपाल महाथेरो छत्रपती संभाजी नगर, प्रमुख अतिथी पु.भदन्त डॉ.इंदवंश महाथेरो,कुशीनगर, उत्तर प्रदेश, भदंत मुदितानंद महाथेरो,परभणी,भदन्त पय्याबोधी थेरो, नांदेड, भदंत पय्यानंद थेरो लातुर यांची उपस्थिती असणार आहे.
याबरोबरच भदन्त धम्मसार थेरो किल्लारी, भदंत सुभूती थेरो नांदेड, भदंत धम्मशील थेरो बीड, भदंत नागसेन बोधी उदगीर,आदी भन्ते व बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, लातूर रिपाईचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, जेष्ठ नेते श्रीकांत बनसोडे,आर.जी.कांबळे, अहमदपूर,बा.ह.वाघमारे, अहमदपूर, श्रीराम खळगे, माजलगाव, सतीश बनसोडे,सेलू, जयश्रीताई साळवे,बीड,ललिताताई उजगरे, माजलगाव,एस.एस.शिंदे, बीड, उत्तम डोंगरे, अंबाजोगाई, माधवराव वाघमारे, अंबाजोगाई, गोपीनाथ बनसोडे, बीड,स्नेहा खंडागळे,बीड,कचरूतात्या खळगे माजलगाव,विनयजी ढवळे अहमदपूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मृगदायवन महाविहारासाठी प्रभाकर सोनबा गवळी व शांता प्रभाकर गवळी या दाम्पत्यानी आपली जमीन दान दिली आहे.या धम्म परिषदेत बौद्ध उपासक,उपासिका तसेच बहुजन बांधवानी शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा