परळीच्या महाएक्सपोत मुख्यमंत्री अमेरिका भारत करारावर महाखोटं बोलले - कॉ.अजय बुरांडे
किसान सभेच्या वतीने कराराची बीड जिल्ह्यात होळी करणार
परळी प्रतिनिधी. नुकतेच परळी येथे झालेल्या महा एक्सपो पशु प्रदर्शनामध्ये अमेरिका भारत व्यापारी कराराबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धडधडीत महाखोटं बोलले .या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करनी आणि कथनीमध्ये फरक असल्याचे किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष काँ. अजय बुरांडे यांनी आज दिनांक 16 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. तसेच लवकरच संपूर्ण बीड जिल्ह्यात किसान सभेच्या वतीने या कराराची जाहीर होळी करणार असल्याचेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना अजय बुरांडे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचं पाठ आणि मागचं सपाट या पद्धतीने मागच्या केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणी बद्दल काहीही ठोस कृती नसताना जेव्हा येईल तेव्हा मराठवाड्याच्या विकासाबद्दल घोषणा करून कथनी आणि करनी यात फरक असल्याचे दाखवून दिले आहे.
परळी वैजनाथ येथे आयोजित महा एक्सपो 2026 पशुप्रदर्शनात मुख्यमंत्री यांनी भारत अमेरिका या मध्ये नव्याने झालेला व्यापार करार याचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांनी देशाचे प्रधानमंत्री यांचे आभार मानले. आणि भारतासाठी अमेरिकेची मोठी बाजारपेठ खुली झाल्याचे सांगितले. तसेच कृषी क्षेत्रात कोणत्याही अमेरिकन मालाला भारतात खुली नसल्याचे सांगत काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरून कृषी मालाचे मूल्य पाडत असल्याचे ठणकावून सांगितले. सूट दिली नसल्याचे या करारात लिहिले आहे असे सांगतानाच कृषी क्षेत्रा संदर्भात कसल्याही प्रकारचा समझोता झाला. मात्र इथेनोल, भारतात बंदी असलेल्या जीएम सोयाबीन पासून तयार केलेले खाद्यतेल, सोयापेंड, पशुखाद्य, स्थिरिट, सुकामेवा, फळे, भाज्या व पोल्ट्री कृषी मालावर प्रक्रिया करून तयार केलेले अन्नपदार्थ यासाठी तूर्तास अमेरिकन मालास 0% आयात शुल्कात भारतीय बाजारपेठ खुली करून दिली आणि याच वेळी भारतीय मालावर मात्र 18% आयात शुल्क आकारले. भारतीय कृषी बाजारावर याचा परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी पदग्रहणाच्या वेळी घेतलेल्या शपथीचे स्मरण करून सत्य स्पष्ट करावे.
सोयाबीनचा अफवा उठून भाव पडल्याचे आरोप करताना 5330 हमीभाव असताना साडेतीन हजार रुपयांमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत हमीभावाच्या खाली ज्या शेतकऱ्यांना विकावे लागले. त्यांना भावांतर योजनेतून राहत देणार आहात का? कापसाचे भाव हमीभावाच्या खाली घसरलेले आहेत हे भाव घसरवण्यामागे आपल्या धोरणाचा मोठा वाटा नाही का? मिनिमम सपोर्टिंग प्राईस ही बाजारभावाला आधार देण्यासाठी असते. सीसीआय अंतर्गत शेतकऱ्यांचा खरेदी केलेला कापूस आपण शेतकऱ्यांकडील माल संपायच्या आत बाजारभावापेक्षा कमी किमतीत बाजारात विक्रीस काढल्याने कापसाचे भाव पडले असून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे आपल्या धोरणामुळे झालेल्या या नुकसानाची भरपाई आपण भावांतर योजनेतून देणार आहात का?
उत्पादन खर्च व त्यावर दीडपट अधिक भाव अशा प्रमाणे आधारभूत किंमत जाहीर करून शेतात उत्पादित झालेल्या शेतमालाची संपूर्ण खरेदी कायद्याच्या स्वरूपात हमी शेतकऱ्यांना देणार का ?असे प्रश्न बीडच्या किसान सभेने उपस्थित केले असून याबाबत लवकर किसान सभेकडून परळीमध्ये शेतकरी परिसंवाद आयोजित करून अमेरिकेसोबत नव्याने झालेला कराराचा कृषी क्षेत्रावर व सर्व सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात होणार विपरीत परिणाम आणि केंद्र आणि राज्य सरकारची शेती आणि शेतकरी विरोधी भूमिका आम्ही किसान सभा शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत.
सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. आणि सरकार व जबाबदार लोकप्रतिनिधी धादांत खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. सोबतच भारताचा प्रमुख कापूस खरीदार देश अमेरिकेतील कापसाची खरेदी करून झिरो टक्के नुसार अमेरिकेत कापड निर्यात करणार आहे तसेच भारतीय टेक्स्टाईल इंडस्ट्रीला सुद्धा अमेरिकेत कापड विकण्यासाठी 18% टेरिफ माफ करून घ्यायचा असेल तर अमेरिकन कापूस झिरो टक्के देण्याचे अमिष अमेरिकेने दाखवले आहे .त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशा उध्वस्त होणार आहे याबद्दल मुख्यमंत्री काहीच का बोलत नाहीत .उलट या व्यापार कराराचे स्वागत करतात याचा किसान सभा जाहीर निषेध करते .
या विरोधामध्ये जिल्ह्यात ठीक ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या या जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याचा व मराठवाड्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्येस सरण रचणारा शेतकरी विरोधी भारत अमेरिका कराराची होळी करणार याची माहिती अजय बुरांडे यांनी दिली.या पत्रकार परिषदेत शिक्षक नेते पी.एस.घाडगे, पांडुरंग राठोड, मुरलीधर नागरगोजे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा