आई वडिलांनी बालवयात मुलांकडे स्वतः लक्ष देण्याची आवश्यकता - डॉ. लेफ्टनंट कर्नल मधुकर कांबळे उजगरे,कांबळे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

आई वडिलांनी बालवयात मुलांकडे स्वतः लक्ष देण्याची आवश्यकता -   डॉ.  लेफ्टनंट कर्नल मधुकर कांबळे  

उजगरे,कांबळे परिवाराचा स्तुत्य उपक्रम 

आंबेजोगाई प्रतिनिधी      आई वडिलांनी  बालवयात आपल्या मुलांकडे स्वतः लक्ष देऊन नेहमी सतर्क राहणे फार आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ . लेफ्टनंट कर्नल मधुकर कांबळे यांनी केले.ते जि.प .प्रा शाळा दिपेवडगाव ता
 केज जिल्हा बीड येथे दिनांक १९ फेब्रु २०१६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य विविध शालेय स्पर्धेमध्ये  निवड झालेल्या नावलौकिक  कमावलेल्या  विद्यार्थ्यांच्या बक्षीस कौतुक कार्यक्रमात बोलत होते.
    पुढे बोलताना ते म्हणाले की, समृतीशेष हरीभाऊ कांबळे यांच्या  गेल्या ११ वर्षांपासून पुण्यस्मरणानिमित  आयोजन करण्यात येते. तसेच दिवंगत जनाबाई हरीभाऊ कांबळे यांच्या ७व्या स्मरणार्थ  गेल्या ११ वर्षांपासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, यावेळी  विविध सहभागी  स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक, बक्षीस दिले जाते,   भाषण स्पर्धा, या वेळी इयत्ता  सातवीच्या विद्यार्थीयांनी बालसभाचे आयोजन  केले होते . विद्यार्थ्यांनी भाषणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
‌‌ ‌ दिपेवडगाव येथील उच्चविद्याभूषित  डॉ . मधुकर कांबळे लेफ्टनंट कर्नल, SRTR मेडिकल महाविद्यालयाचे प्रोफेसर छ.संभाजीनगर येथील मा पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. विठ्ठल कांबळे, सेवानिवृत दूरसंचार मुरलीधर कांबळे, परभणी जिल्यातील पाथरी येथील उपक्रमशील शिक्षक  संजय उजगरे सर,    रेणापूर जिप आदर्श शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिकराव टेंगसे,   सौ ॲड मंजुषा कांबळे छ संभाजी नगर येथील रमाई फाऊंडेशनच्या छाया कांबळे, पुणे चाकण मेदनकरवाडी येथील ग्रा.सदस्या सुमन खरात, कमल संजय उजगरे आदींची यावेळी उपस्थिती होती.
   सर्व विद्यार्थ्यांना लेखन, वाचन साहित्याचे  वाटप करण्यात आले, तसेच कांबळे कुटुंबियांकडून शाळेसाठी ५ व्हाईट बोर्ड सप्रेम भेट देण्यात येणार आहेत, या पूर्वी त्यांनी शाळेसाठी आवश्यक साहित्य देण्यात आले आहे, या कार्यक्रमासाठी गावातील सुजाण नागरिक,शिक्षण प्रेमी नागरिक  तसेच  विद्यमान सरपंच श्री. दिपक गुळभिले तथा ग्रामपंचायत सदस्य, शा.व्य.स.अध्यक्ष श्री.संदिप गुळभिले तथा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील बहुसंख्य नागरीक  शाळेतील  शिक्षक दिपेवडगाव येथील उच्च      विद्याभूषित कांबळे परिवार कडून त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेस शै.वस्तू आणि विद्यार्थाना साहित्य वाटप करण्यात. या कार्यक्रमा साठी गावातील सुजाण नागरिक,शिक्षण प्रेमी नागरिक  तसेच विद्यमान सरपंच श्री. दिपक गुळभिले तथा ग्रामपंचायत सदस्य, शा.व्य.स.अध्यक्ष श्रीसंदिप गुळभिले तथा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील बहुसंख्य नागरीक  शाळेतील मुख्याध्यक पाखरे व्हि.डी,जाधव जि.व्ही, श्रीमती वाघचौरे मॅडम , श्रीमती बेले मॅडम, श्रीमती फरताडे मॅडम, आणि गावातील सौ. पूजा गुळभिले, सौ सविता गुळभिले, सौ. वर्षा तांबुरे, सौ. वनिता गायकवाड, श्री तानाजी गुळभिले,, अशोक गुळभिले, गायकवाड सर, आदीच्या उपस्थितीमध्ये  मा . संजय उजगरे , कमल संजय उजगरे, सुमन खरात यांनी मनोगत व्यक्त केली, 
    सूत्रसंचलन श्रीमती वाघचौरे मॅडम यांनी केले, गेल्या ११ वर्षापासून पाथरी येथील शिक्षक संजय उजगरे यांच्या संकल्पनेतून शाळेत सामाजभिमुख  उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.उपेक्षित पालक समाज ,विद्यार्थी, शिक्षक  आणि गावाबद्दल आपुलकी मैत्री नात्याची भावना या कार्यक्रमातून निर्माण होत असल्याचे दिसून आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने