पौष पौर्णिमेनिमित्त मृगदायवन महाविहार जवळा फकीर येथे धम्मदेसना- भदंत पय्यातीस्स महाथेरो धम्मबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

पौष पौर्णिमेनिमित्त मृगदायवन महाविहार  जवळा फकीर येथे धम्मदेसना- भदंत पय्यातीस्स महाथेरो 

धम्मबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

परळी प्रतिनिधी.      पौष पौर्णिमा निमित्ताने मृगदायवन महाविहार, सारनाथ पार्क,जवळा फकीर येथे धम्मदेशना व दुसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेविषयी धम्म बांधवांना माहिती देण्यात येणार असल्याचे भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
    याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी पुढे म्हटले आहे की, दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 12.30  वाजता धम्मदेसना तसेच त्यानंतर डॉ.उगले बीड  हे मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत तसेच त्यानंतर दुसऱ्या बौद्ध धम्मा परिषदेविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. 
   या धम्मदेशना कार्यक्रमास परिसरातील बौद्ध उपासक ,उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे तसेच सारनाथ पार्क येथे सुरू असलेल्या भिक्खू निवासासाठी धम्मदान देण्याचे आवाहनही भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने