परळी तालुक्यात वृक्षलागवड व स़गोपन योजनेत भ्रष्टाचार ?चोखामेळा सोसायटी सदस्यांचे 26 जानेवारीला उपोषण - बालासाहेब जगतकर

परळी तालुक्यात वृक्षलागवड व स़गोपन योजनेत भ्रष्टाचार ?

चोखामेळा सोसायटी सदस्यांचे 26 जानेवारीला उपोषण - बालासाहेब जगतकर

परळी प्रतिनिधी.               मौजे चांदापूर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष संगोपन योजनेअंतर्गत बुद्धमूर्ती चोखामेळा सहकारी सोसायटीकडे जाणारा रस्ता व परिसरामध्ये वृक्ष लागवड केलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी यासाठी दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
     याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या महाराष्ट्र शासना अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड व संगोपन ही योजना जोरात चालू असून तिचा अनेक लोक व अधिकारी गैरफायदा घेऊन शासनाचं अनुदान लाटण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून परळी शहरातील चोखामेळा सहकारी सोसायटी सर्वे नंबर 439 व 440 मधील मागासवर्गीयांच्या जमिनी मध्ये काही ग्रामपंचायतीने बोगस ठराव देऊन सदरील योजना अधिकाऱ्यांना हाताशी धरून  लाटण्याचा प्रयत्न केला असून यात या सर्वे नंबर मध्ये 1000 झाडाची लागवड केली असल्याची माहिती प्राप्त झाली असून ती कोणत्या आधारे केली सदरील संस्था ही अस्तित्वातच नाही तर कोणत्या सदस्यांनी परवानगी दिली कोणत्या अधिकाऱ्यांनी सदरील योजनेचे कागदपत्रे पडताळून परवानगी दिली. यामुळे मागासवर्गीयाच्या जमिनीवर अतिक्रमण करीत असल्याची शंकाही निर्माण झाली असून अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून शासनाच्या योजनेचा निधी हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे व सदरील काम बंद करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही दिनांक 31 - 10-  2025 रोजी निवेदन दिले असता कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आम्ही दिनांक 26 जानेवारी 2026 पासून परळी पंचायतीसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने