व्हि.के.कलर होमचा तरुणांनी आदर्श घ्यावा -
सरसेनानी आनंदराज आंबेडकर.
परळी प्रतिनिधी:- परळी शहरातील व्ही.के. कलर होमचा बेरोजगार तरुणांनी आदर्श घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, तथा सरसेनानी, आनंदराज आंबेडकर (साहेब) यांनी केले.ते कलर होमला सदिच्छा भेट दिल्यानंतर बोलत होते.
यावेळी सर्वप्रथम महाकारूणीक, तथागत, भगवान बुद्ध, महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूष्प, धूप, दिपाने पूजन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, तथा सरसेनानी आदरणीय, आनंदराज आंबेडकर (साहेब) यांनी केले.त्यानंतर VK कलर होमच्या वतीने VK कलर होमचे संचालक आयु. विशाल (शेठ) कांबळे, विनोद (भाऊ) कांबळे, विवेक (भैय्या) कांबळे यांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा शाल व पुष्पहार घालून भव्य दिव्य असा सत्कार केला.
त्यानंतर परळी तालुक्यातील उपस्थित सर्व भीमसैनिकांनी सुद्धा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर (साहेब) म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता आरक्षण संपत आलेले आहे. तसेच तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता, आजच्या तरुणांनी छोटा-मोठा उद्योग करावा तसेच VK कलर होमचा आदर्श घ्यावा, तसेच VK कलर होमला समाज बांधवांनी सहकार्य करावे. व VK कलर होम मधूनच आपण रंग, बिर्लापुट्टी तसेच पीयुपी तसेच बांधकाम उपयोगी सर्व साहित्य घेऊन VK कलर होमला सहकार्य करावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, तथा सरसेनानी आनंदराज आंबेडकर (साहेब) यांनी मनोगतात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी परळी तालुक्यातील भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा