परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम सरकतेय पुढेपाठीमागे रस्त्याला बोगस कामांमुळे पडले जागोजागी तडे

परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम सरकतेय पुढे

पाठीमागे  रस्त्याला  बोगस कामांमुळे पडले जागोजागी तडे

परळी ( रानबा गायकवाड)  गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या परळी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 चे काम कासवगतीने हळूहळू पुढे पुढे सरकतेय.तर जे काही रस्त्याचे काम झाले आहे त्या रस्त्याला जागोजागी तडे गेल्याने कामात प्रचंड बोगसगिरी व भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.या निकृष्ट कामाचा मात्र या रस्त्यावरून ये जा करणाणा-या नागरिकांना व प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.अनेकांचा बळी घेणारा हा रस्ता केंव्हा पुर्ण होईल याची खात्री नाही.
   याबाबत अधिक माहिती अशी की, परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 चे काम 2020 - 21 पासून सुरू झाले आहे.हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे.परळीतुन नवीन वीज निर्मिती केंद्र, सिमेंट फॅक्टरी, पोद्दार लर्निग स्कूल याकडे दररोज हजारो नागरिक व विद्यार्थी यांचे जाणे येणे असते.टेंडरप्रमाणे हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते.परंतू अद्याप सदरील रस्तयाचे काम अपुर्णच आहे.अनेक ठिकाणी पुल होणे गरजेचे आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.तर जे काही काम झालेले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस झाल्याचे दिसत आहे.
     निकृष्ट कामाचा नमुना या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहावयास मिळत आहे.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघातात जीव गेले आहेत तर अनेक जण जख्मी झाले आहेत.झालेले रस्त्याला मधोमध भेगा पडलेल्या आहेत.त्या बुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.या निकृष्ट व बोगस कामास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
    याबरोबरच रखडलेले पुल आणि शिल्लक राहिलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा आणखी नाहक निष्पाप नागरिकांचा व प्रवाशांचा बळी जाऊ शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने