धनगर समाज संघर्ष योध्दा दिपक बोराडे यांच्या परळीतील कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - दगडू भाळे
तालुक्यात विविध ठिकाणी घोंगडी बैठका
परळी प्रतिनिधी. धनगर समाज संघर्ष योध्दा दिपक बोराडे यांचा 13 जानेवारी रोजी परळी तालुक्यात झंझावाती दौरा असून या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दगडू भाळे यांनी केले आहे.
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दिपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 21 जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने धनगर समाज बांधव एकवटणार आहे.या निमित्ताने ते परळीत माजलगाव मार्गे 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता येणार आहेत.शहरातील धनगर समाजाच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली नंतर धनगर समाजासाठी लढा देणारे दीपक बोराडे हे धनगर समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत.
याबरोबरच परळी तालुक्यात त्यांचे विविध ठिकाणी घोंगडी बैठका आयोजित केलेल्या आहेत.तेथेही दिपक बोराडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.परळीतील कार्यक्रमास तसेच दिनांक 17 जानेवारी रोजी जालना येथून निघणा-या धनगर जमातीच्या एस. टी.आरक्षणाचा सुमारे दोन हजार गाड्यांचा ताफा हा मुंबईकडे रवाना होणार असल्याचे डी.एम.भाळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा