बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेत बीड जिल्हा देशात दुसरा - गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी

बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेत बीड जिल्हा देशात दुसरा - गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी 


परळी प्रतिनिधी.      बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी देशभरात शाळांमधून बालप्रतिबंधक प्रतिज्ञा अभियान राबविण्यात येत असून देशभरात बीड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अभियान अधिक गतिमान करण्यासाठी सर्व शाळांनी अधिक पालकापर्यंत पोहोचावे असे आवाहन परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी केले आहे. 
       गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी परळी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या  प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील 100% शिक्षकांकडून बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञाची  लिंकवर माहिती भरून प्रमाणपत्र घेण्याबाबत आदेशित केले आहे.आवश्यकता पडल्यास मुख्याध्यापकांनी फोन करून सांगावे. तसेच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडूनही बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा बाबत प्रमाणपत्र घेण्याची सक्ती करण्यात यावी. 
तसेच सर्व प्राथमिक शाळा मधून विद्या समीक्षा केंद्रावर (VSK) वर दररोज उपस्थिती नोंदवण्याची सक्ती करण्यात यावी. आपापल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांमधील शिक्षक उपस्थिती नोंदवतील याची दक्षता घ्यावी. असेही म्हटले आहे.
    दरम्यान हे अभियान उत्कृष्टपणे परळी तालुक्यातील सर्व शाळांमधून राबविले जात असल्याने परळी तालुक्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ही गती अशीच कायम राहिली तर लवकरच बीड जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर जाणार आहे. या अभियानावर बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने