आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाकेर, सय्यद, श्रीमती देवकते, गायकवाड या शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न
दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्कूल डेही उत्साहात साजरा
परळी प्रतिनिधी. येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची शाळेतील शिक्षक सय्यद शाकेर व इतर पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गुणवंताची खाण असल्याचे यावेळी रानबा गायकवाड यांनी सांगितले.
परळी शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी.बी.शेख होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक अन्वर सर,जाफर सर,सहारा सेवाभावी संस्थेचे मोईन फारुखी,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती देवकते मॅडम,शिक्षक गौरव पुरस्कार विजेते गायकवाड सर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रानबा गायकवाड,माजी मुख्याध्यापक अन्वर सर,अनिस बाजी , शाकेर सर, गायकवाड सर,देवकते मॅडम,मुख्याध्यापक शेख सर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
याच वेळी स्कुल डे च्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या शिक्षक बनलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच काही विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक उर्दु माध्यमाचे मुख्याध्यापक इम्रान सर यांनी केले.सुत्रसंचलन गर्जे मॅडम व सोम्मया बाजी यांनी केले.कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थ्याथिनी,पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा