परळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रानबा गायकवाड कार्याध्यक्षपदी नितीन ढाकणे तर शहराध्यक्षपदी शेख मुकरम 6 जानेवारी रोजी भव्य दर्पण दिनाचे आयोजन

परळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रानबा गायकवाड कार्याध्यक्षपदी नितीन ढाकणे तर शहराध्यक्षपदी शेख मुकरम 

6  जानेवारी रोजी  भव्य दर्पण दिनाचे आयोजन 

परळी /प्रतिनिधी 

   परळी शहर व तालुका पत्रकार संघाची 2026 या नवीन वर्षाची कार्यकारणी नुकतीच निवडण्यात आली. तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सम्राटचे प्रतिनिधी रानबा गायकवाड यांची तर शहराध्यक्षपदी दैनिक सिटीजनचे प्रतिनिधी शेख मुकरम यांची सर्वानुमते  निवड करण्यात आली. येत्या 6 जानेवारी रोजी परळी शहरात भव्य दर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 
    परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे दिनांक 25 डिसेंबर रोजी दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी धनंजय आरबुने यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत परळी तालुका व शहर पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दैनिक सम्राट चे प्रतिनिधी रानबा गायकवाड, उपाध्यक्ष  पत्रकार सय्यद सबात अली,तालुका कार्याध्यक्ष दैनिक अतुल्य महाराष्ट्राचे संपादक नितीन ढाकणे, तालुका उपाध्यक्ष अनुप कुसुमकर, सचिव दैनिक बीड चौफेरचे बालाजी ढगे, सहसचिव शेख मुदस्सीर,तर शहराध्यक्षपदी दैनिक सिटीजनचे प्रतिनिधी शेख मुकरम, शहर उपाध्यक्ष समीर इनामदार, सचिव दैनिक रणझुंजार चे पत्रकार संतोष जुजगर, सहसचिव दैनिक लोकमत समाचार चे पत्रकार शेख अफसर तर कार्यकारणी मध्ये  गावकरीचे पत्रकार जगदीश शिंदे,  दैनिक जंग बीड, पत्रकार बाबा शेख, पत्रकार अमोल सूर्यवंशी, मुंबई जंगचे संपादक बालासाहेब मुजमुले याबरोबरच सल्लागार म्हणून ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, धनंजय आरबुने, जगदीश शिंदे, भगवान साकसमुद्रे सहआदींचे निवड करण्यात आली आहे. 
   दरम्यान तेथे सहा जानेवारी 2026 रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा दर्पण दिन परळी शहरात भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.या बैठकीचे सुत्रसंचलन दैनिक पुण्यभुमीचे पत्रकार भगवान साकसमुद्रे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने