मिलिंद विद्यालयाचे उपप्राचार्य शेख इरफान राज्यस्तरिय शिक्षक पुरस्काराने सन्मानित
परळी(प्रतिनिधी):- पुणे स्थित स्विफ्ट इन लिफ्ट या संस्थेचा प्रत्येक वर्षी दिला जाणारा राज्यस्तरिय शिक्षक पुरस्कार 2025 या वर्षात परळी येथील नामाकिंत मिलिंद माध्य.व उच्च माध्य. विद्यालयातील उपप्राचार्य शेख इरफान मैनुद्दीन यांना नुकतेच पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
सदरील पुरस्कार वितरण सोहळा दि21 डिसेंबर2025, रविवार रोजी पुण्यातील एलप्रो सिटी स्कोअर मॉल, एम.जी.रोड, पिंपरी- चिंचवड- पुणे येथील सभाग्रहात सकाळी 10 वा. संपन्न झाला.पुरस्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस _कॅप्टन_ आशिष दामले हे उपस्थित राहणार असून कार्यकृमाला अध्यक्ष म्हणून स्विफ्ट इन लिफ्ट संस्थेचे अध्यक्ष तथा CEO श्री निलेश साबे हे उपस्थित होते.
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी श्री शेख इरफान यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे आभिनंदन होत आहे. मिलिंद विद्यालयाचे संस्थाप्रमुख, प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, प्राध्यापक या सर्वांनीही शेख इरफान यांचे आभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा