परळी नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस व वंचित बहुजन आघाडीस माकप चा पाठिंबा
माकपच्या पाठिंब्याने आघाडीची ताकद वाढली
परळी वै ता.28 प्रतिनिधी
परळी नगर परिषद निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कॉग्रेस व वंचित आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवास पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.माकपच्या या पाठींब्यामुळे परळी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढल्याचे दिसत आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यांची बैठक नुकतीच झाली. त्यात परळी नगर परिषद निवडणुकी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. माकप भाजप सोबत असलेल्या महायुतीतील पक्षांच्या कायम विरोधात राहीलेला आहे. त्यामुळे परळी नगर परिषद निवडणुकीत कॉंग्रेस व वंचित आघाडी च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सय्यद मैमुना हनिफ करीम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच नगरसेवक पदासाठी कॉंग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवास पाठींबा देण्यात आला आहे. ज्या प्रभागात नगरसेवक पदासाठी कॉंग्रेस व वंचित आघाडी चा उमेदवार नसेल तेथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारास पाठींबा देण्यात आला आहे.
बैठकीला माकपचे जिल्हा सचिव कॉ अजय बुरांडे, कॉ पी एस घाडगे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ दत्ता डाके, कॉ बब्रुवान पोटभरे, कॉ अशोक थोरात, कॉ बळीराम भुंबे, कॉ रोहिदास जाधव यांची उपस्थिती होती. जिल्हा सचिव मंडळ सदस्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे परळी नगर परिषद निवडणुकीत माकपचा पाठिंबा असल्याचे निवेदन पक्षाचे तालुका सचिव कॉ गंगाधर पोटभरे यांनी केले आहे. परळी शहरातील नागरिकांनी कॉंग्रेस व वंचित आघाडी च्या उमेदवारास बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन माकप च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा