जो नगरसेवक पाच वर्षानंतर मतांसाठी वार्डात फिरकतोय त्याला पाडण्याची गरज पैश्यावर मते विकत घेतो ही घमेंड उतरवा

 जो नगरसेवक पाच वर्षानंतर मतांसाठी वार्डात फिरकतोय त्याला पाडण्याची गरज 


पैश्यावर मते विकत घेतो ही घमेंड उतरवा 

परळी प्रतिनिधी     नगरसेवक हे पद शोभेची वस्तू नाही किंवा गावात मिरवायचे पद नाही.तर निवडून आल्यानंतर आपल्या वार्डातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याने काम करायचे असते.पण अनेक जण एकदा निवडून आले की पुन्हा गल्लीत,वार्डात फिरकत नाहीत.ते आता नगर परिषद निवडणूक लागली की मतांसाठी वार्डात फिरकत आहेत.अशांना मतदारांनी पाडण्याची गरज आहे.लोकांना पैसे वाटून आम्ही निवडून येऊ ही घमेंड मतदारांनी उतरवण्याची गरज आहे.
      सध्या परळी नगर परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे.प्रचाराने जोर धरला आहे.आश्वासनांचा पाऊस पडत आहे.मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या जात आहेत.अनेक जण नगरसेवक पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत.काही जण माजी नगरसेवक आहेत तर अनेक नवे चेहरे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
   जनतेने ज्यांना नगरसेवक बनवले होते.लोकांची सेवा करण्याची संधी दिली होती. ते मात्र  2019 मध्ये निवडून आले की पुन्हा 2025 च्या नगरपालिका निवडणुकीत लोकांच्या पुढे दिसत आहेत. मला निवडून द्या म्हणत आहेत. म्हणजे बरोबर पाच वर्षानंतर वार्डात फिरकत आहेत .पाच वर्षे त्यांना आपला वार्ड दिसला नाही? किंवा वार्डातल्या नागरिकांच्या समस्या.? अशा लोकांना आणि नगरसेवकांना वाटते आपण लोकांना पैसे वाटून निवडून येऊ शकतो. पुन्हा लोकांची कामे नाही केली तरी चालतात .लोकांकडे नाही पाहिले तरी चालते. पैशावर मध्ये विकत घेता येतात. ही त्यांची घमेंड फक्त मतदाराच उतरवू शकतो. आणि तो अधिकार घटनाकार डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक मतदाराला दिलेला आहे.
 
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने